नियमांचा भंग केल्याने Ola ला रिझर्व्ह बँकेचा दणका; इतक्या कोटींचा ठोठावला दंड

RBI Penalty on Ola: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ओला फायनान्शियल सर्व्हिसेसला नियमांचे पालन न केल्याबद्दल मोठा दंड ठोठावला आहे. दंड ठोठावण्यापूर्वी आरबीआयने कंपनीला नोटीस बजावली होती.

Updated: Jul 13, 2022, 10:22 AM IST
नियमांचा भंग केल्याने Ola ला रिझर्व्ह बँकेचा दणका; इतक्या कोटींचा ठोठावला दंड title=

 

मुंबई : RBI Imposes Penalty on Ola:भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने Ola Financial Services Pvt Ltd वर 1.67 कोटी रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) सांगितले की, प्रीपेड पेमेंट सिस्टम आणि नो युवर कस्टमर (KYC) नियमांशी संबंधित तरतुदींचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. ओला फायनान्शिअल सर्व्हिसेस ही ओलाची उपकंपनी आहे. जी अॅप आधारित कॅब सेवा प्रदान करते. दुचाकी आणि चारचाकी वाहनांव्यतिरिक्त, वैयक्तिक कर्ज देखील देते

रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओला फायनान्शियल सर्व्हिसेस केवायसीबाबत जारी केलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. रि बँकेच्या म्हणण्यानुसार, यासंदर्भात कंपनीला यापूर्वी नोटीसही बजावण्यात आली होती आणि सूचनांचे पालन न केल्याबद्दल दंड का भरू नये, अशी विचारणा करण्यात आली होती.

आरबीआयच्या नियमांचा भंग
आरबीआयने म्हटले आहे की, "कंपनीच्या उत्तराचा विचार केल्यानंतर, निर्देशांच्या अंमलबजावणीत त्रुटी राहिल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे आणि ओलाला दंड आकारणे आवश्यक आहे." 

नियामक अनुपालनातील त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. ओला फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या ग्राहकांसोबतच्या कोणत्याही व्यवहाराच्या कायदेशीरपणाबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा हेतू नाही.

आरबीआयने या बँकांवरही ठोठावला दंड 
सोमवारी आरबीआयने नियमांचे पालन न केल्याबद्दल तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला होता. ज्या बँकांवर हा दंड ठोठावण्यात आला. त्यात नाशिक व्यापारी सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि नॅशनल सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लि.चा सामावेश होता.