Reserve Bank of India: रिझर्व बॅकेकडून (Reserve Bank Of India) बॅंकांना घेऊन एक यादी जाहीर करण्यात आली आहे. आरबीआयने (RBI) जारी केलेल्या यादीमध्ये सांगितले की, कोणत्या बॅकेत तुमचे पैसे सुरक्षित आहेत आणि कोणत्या बॅकेत पैसे सुरक्षित नाही, याची यादी जाहीर करण्यात आली आहे. देशातील कोणत्याही बॅकेत आर्थिक नुकसान होत असेल तर ग्राहकांसह देशातील सर्व बॅकेचे नुकसान होऊ शकते, अशी माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे.
रिझर्व बॅकेकडून डोमेस्टिक सिस्टमिकली इम्पॉर्टेंट बॅक (D-SIBs) 2022 ची यादी जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये एक सरकारी आणि 2 खासगी बॅंकेचा समावेश आहे. त्याचबरोबर मागील वर्षातील बॅकेची नावे ही यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
RBI च्या यादीनुसार, SBI च्या जोखीम भारित मालमत्तेपैकी 0.60 टक्के टियर-1 म्हणून ठेवण्यात आले आहेत. त्याच वेळी, ICICI आणि HDFC ची जोखीम भारित मालमत्ता 0.20 टक्के आहे.
आरबीआईने दिलेल्या माहितीनूसार, जाहीर करण्यात आलेल्या वर्ष 2022 मधील यादीमध्ये बॅंक ऑफ इंडियासह खासगी बॅकेतील HDFC Bank आणि ICICI Bank यांचीही नावे यादीत आहेत. तसेच या यादीमध्ये अशी दोन नावे आहेत, जर त्या बॅकेचं नुकसान झालं तर संपूर्ण देशभरातील आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होईल.
वाचा : 200MP चा कॅमेरा असलेला स्वस्त फोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
वर्ष 2015 पासून, रिझर्व्ह बँक अशा बँकांची यादी जारी करते ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सर्वात महत्वाच्या आहेत आणि RBI त्यांच्यावर लक्ष ठेवून असते. बँकांना आरबीआयकडून रेटिंगही दिले जाते, त्यानंतरच या महत्त्वाच्या बँकांची यादी जाहीर केली जाते. सध्या या यादीत ३ बँकांची नावे आहेत. तसेच 2015 आणि 2016 मध्ये, RBI ने या यादीत फक्त SBI आणि ICICI बँक समाविष्ट केली होती. यावरून लोबल रेटिंग एजेंसी मूडीजने सवालही उपस्थित केले होते. यानंतर 2017 मध्ये एचडीएफसीचे नाव समाविष्ट करण्यात आले.