RBI च्या नव्या नियमामुळं Debit, Credit कार्डचा वापर बदलणार

RBI New Rules on Debit and Credit Card : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियम लागू करण्यात येतात. काही आर्थिक धोरणं राबवली जातात. नागरिकांना बँकिंग क्षेत्रातील मिळणाऱ्या सुविधांवर आरबीयाची नजरही असते.   

सायली पाटील | Updated: Jul 6, 2023, 08:10 AM IST
RBI च्या नव्या नियमामुळं Debit, Credit कार्डचा वापर बदलणार title=
RBI issues New Rules On Debit Credit Cards Rupay Card know latest update

RBI New Rules on Debit and Credit Card : डेबिट आणि क्रेडिट किंवा या दोन्हींपैकी एक कार्ड जरी तुम्ही वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण, आता याच कार्ड्सच्या वापरासंदर्भातील एक मोठी Update समोर आली आहे. थोडक्यात सांगावं तर आता डेबिट आणि क्रेडिट कार्ड तुम्ही कुठंही वापरू शकणार आहात. 

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार अमुक एका नेटवर्कवरच कार्ड चालेल ही अट आता शिथिल करण्यात आली असून, ते कोणत्याही नेटवर्कवर वापरता येणं शक्य होणार आहे. सदरील बदलांसंबंधीचा प्रस्तावही पुढे करण्यात आला असून, हा बदल 2023 च्या ऑक्टोबर महिन्यापासून लागू असेल.

सर्वसामानान्यांचं मत विचारात घेणार RBI 

कार्डच्या नेटवर्कसंदर्भातील बदलाच्या अनुषंगानं आरबीआयनं सर्वसामान्यांकडून त्यांची मतंही मागवली आहेत. कार्ड धारक आणि मर्चंट (दुकानदार) यांच्यामध्ये असणाऱ्या देवाणघेवाणीचा आणखी सुकर करण्यासाठी आरबीआयनं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain News : रायगडमध्ये रेड अलर्ट; कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार 

 

तुम्ही कधी खरेदीसाठी कुठं गेला असाल तर फाक क्वचितप्रसंगी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड काही ठिकाणांवर चालत नाही. कोणत्या दुकानावर खरेदीसाठी गेलं असता हा प्रकार घडताना दिसतो. कारण, काही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड स्वाईप करण्याची मुभा ठराविक दुकानदारांनाच असते. प्रत्येक दुकानदारांना याची परवानगी नसल्यामुळं काही ठिकाणांवर VISA चं कार्ड चालतं तर काही ठिकाणी फक्त Mastercard. आता मात्र ही परिस्थिती बदलताना दिसणार आहे. 

आता नेटवर्कही निवडता येणार 

कार्डदात्या बँकेकडून कार्डधारक (खातेधारकांना) अनेक कार्ड नेटवर्कपैकी कोणताही एक पर्याय निवडण्यास सांगण्यात येईल. ज्यानंतर ग्राहकांना कार्डचा वापर करता येईल.  शासनाच्या या नव्या योजनेमुळं रुपे कार्डचाही वापर वाढवण्याचा आरबीआयचा मानस असल्याचं सांगण्यात येत आहे. मास्टरकार्ड आणि व्हिसाकडून सहसा कार्डची सुविधा पुवण्यात येते. पण, त्यांच्या नेटवर्कमध्ये रुपे कार्डचा समावेश मात्र नसतो त्यामुळंच हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. 

सध्याच्या घडीला कार्ड नेटवर्क आणि कार्ड देणाऱ्या बँका आणि तत्सम संस्थांमध्ये ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून देण्यासंबंधी ताळमेळ साधला जात नसल्याची बाब निरीक्षणात आल्याचा मुद्दा आरबीआयनं अधोरेखित केला आहे. आरबीआयच्या मते कार्ड देणाऱ्या संस्थानकडून कार्ड नेटवर्कसंबंधी ग्राहकांना सेवेचा लाभ घेता येण्यापासून अडवेल अशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. ज्यामुळं या नवा बदल सकारात्मक परिणाम करताना दिसणार आहे.