Bank Holidays December : डिसेंबर महिन्यात तब्बल 13 दिवस बँक बंद, आरबीआयकडून यादी जाहीर

आरबीआयने (RBI) दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये एकूण 13 दिवस बँक बंद असणार आहेत. या 13 दिवसांमध्ये 4 रविवारचा समावेश आहे.  

Updated: Nov 19, 2022, 05:08 PM IST
Bank Holidays December : डिसेंबर महिन्यात तब्बल 13 दिवस बँक बंद, आरबीआयकडून यादी जाहीर title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Bank Holidays In December 2022  : पाहता पाहता 2022 वर्षातील 10 महिने निघून गेले. नोव्हेंबर हा 11 वा महिनाही संपत आलाय. सर्वांना ख्रिसमस आणि ख्रिस्ती नववर्षाचे वेध लागलेत. या दरम्यान आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) डिसेंबर 2022 महिन्यातील बँक हॉलिडेची यादी जाहीर केली आहे. आरबीआय आपल्या वेबसाईटवर दर महिन्यात किती दिवस बँकचे कामकाज बंद राहणार, याची यादी प्रसिद्ध करते. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये एकूण 13 दिवस बँक बंद असणार आहेत. या 13 दिवसांमध्ये 4 रविवारचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यात बँक कर्मचाऱ्यांना उर्वरित 9 दिवस केव्हा केव्हा सुट्टी आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. (rbi reserve bank of india relesed bank holiday december 2022 list total 13 days work are closed know details) 

डिसेंबर 2022 सुट्ट्यांची यादी (Bank Holidays In December)

3 डिसेंबर-शनिवार- सेटं झेव्हियर्स फेस्टीव्हल - गोवा. 

4 डिसेंबर-रविवार-साप्ताहिक सुट्टी. 

10 डिसेंबर-शनिवार-दुसरा शनिवार. 

11 डिसेंबर- रविवार-साप्ताहिक सुट्टी.  

12 डिसेंबर-सोमवार-पा-तगान नेंगमिंजा संगम-मेघालयात बँक बंद.

18 डिसेंबर-रविवार-साप्ताहिक सुट्टी. 

19 डिसेंबर-सोमवार-गोवा लिबरेशन डे- गोव्यात कामकाज बंद. 

24 डिसेंबर-शनिवार-चौथा शनिवार.

25 डिसेंबर-रविवार-साप्ताहिक सुट्टी.  

26 डिसेंबर- मेघालय आणि सिक्किम आणि मिझोरममध्ये बँक बंद. 

29 डिसेंबर-गुरुवार, गुरु गोविंद सिंह जंयती-चंडीगडमध्ये बँक बंद. 

30 डिसेंबर-शुक्रवार, यू कियांग नंगवाह- मेघालयात बँक बंद.

31 डिसेंबर-शनिवार, मिझोरममध्ये बँक बंद.     

वरील सुट्ट्यांमध्ये काही स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे. बँकाचं कामकाज बंद जरी असलं तरी ऑनलाईन कामकाज सुरुच असणार आहे. इंटरनेट बँकिंग आणि यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करु शकता. अनेकदा काही राज्यांमध्ये विशेष दिवशी सुट्टी असते. मात्र तेव्हा इतर राज्यात सुट्टी असतेच असं नाही. बँकांना काही राष्ट्रीय सुट्ट्या असतात. तेव्हा मात्र संपूर्ण देशात बँका बंद असतात. देशात डिसेंबरमध्ये अनुक्रमे 3,4,10,11,18,24 आणि 25 तारखेला बँका बंद असणार आहेत.  त्यामुळे वरील तारखा पाहूनच बँकेतील व्यवहार करा.