Bank Robbery: मनी हाईस्टपेक्षा थरारक चोरी! फक्त 60 सेकंदात लुटली बँक, पाहा Video

Rajastan Crime News: जदौन गावात असलेल्या एसबीआय बँकेत (Robbery In SBI Bank) चोरी झाली. सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना 17 नोव्हेंबरची असल्याचं समोर आलंय.

Updated: Nov 19, 2022, 04:48 PM IST
Bank Robbery: मनी हाईस्टपेक्षा थरारक चोरी! फक्त 60 सेकंदात लुटली बँक, पाहा Video title=
Bank Robbery SBI Bank

Bank Robbery SBI Bank: नेटफलिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (NetFlix) मनी हाईस्ट (Money Heist) ही वेब सिरीज खुप प्रसिद्ध झाली. चोरीची थरारक घटना यामध्ये दाखवण्यात आली आहे. हा वेब सिरीज (Web Series) पाहून अनेकांच्या अंगावर काटा आलाय. अशातच आता भारतातील मनी हाईस्ट पाहून अनेकांना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. मनी हाईस्टपेक्षा थरारक चोरी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Bank Robbery Caught on Camera Robbers Clean Up Rajasthan SBI Bank in 60 Seconds Watch Video)

चोरीची ही घटना राजस्थानमधील (Rajastan Crime News) पाली जिल्ह्यातील आहे. जदौन गावात असलेल्या एसबीआय बँकेत (Robbery In SBI Bank) चोरी झाली. सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना 17 नोव्हेंबरची असल्याचं समोर आलंय. दोन सशस्त्र दरोडेखोर बँकेत घुसले. त्याने बंदुकीच्या जोरावर बँक लुटली. अवघ्या 60 सेकंदात बँकेतील पैसे घेऊन चोर पळून गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये (CCTV Robbery Video) दिसतंय.

आणखी वाचा - Online Shopping करताय मग 'ही' सावधगिरी बाळगा, नाहीतर व्हाल कंगाल!

व्हिडिओमध्ये दिसतंय की एक हेल्मेट घातलेला व्यक्ती बँकेत येतो. हेल्मेट घातलेल्या माणसाकडे बंदूक देखील आहे. बँक कर्मचारी (Bank employees) त्यांच्या डेस्कवर बसलेले असताना त्यानं हवेत गोळ्या झाडल्या. कर्मचाऱ्यांना धमकावलं... थोड्या वेळाने दुसरा हेल्मेट घातलेला व्यक्ती आला. ज्याच्या हातात एक पिशवी दिसते. 

पाहा Video - 

दरम्यान, त्या व्यक्तीनं बँक कर्मचाऱ्यांना धमकावलं. पैसे घेतले आणि त्यानंतर दोघंही तिथून निघून गेले. फक्त एक मिनिटात चोरांनी चोरीच्या घटना वास्तवात उतरवली. सीसीटीव्हीमध्ये (Bank Robbery Caught on Camera) हा एक मिनिटाचा व्हिडिओ कैद झालाय. पोलीस सध्या या घटनेचा शोध घेत आहेत.