RBI ने केली रिव्हर्स रेपो दरात कपात, ठेवीदारांचे होणार नुकसान?

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आपल्या रिव्हर्स रेपो दरात .२५ टक्के कपात केली आहे. 

Updated: Apr 17, 2020, 01:10 PM IST
RBI ने केली रिव्हर्स रेपो दरात कपात, ठेवीदारांचे होणार नुकसान? title=
संग्रहित छाया

मुंबई : देशात कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे अनेक उद्योग-धंदे बंद आहेत. मोठा आर्थिक फटका बसत आहे. अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक घोषणा केल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्थेला ऊर्जित अवस्था मिळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आपल्या रिव्हर्स रेपो दरात .२५ टक्के कपात केली आहे. त्यामुळे याचा लाभ हा ठेवीदारांना होणार नाही, अशी शक्यता आहे. रिव्हर्स रेपो दरात कपात केल्यामुळे याचा फटका हा खातेदारांना होणार आहे.

COVID-19 : 'RBI नुकसान रोखण्याच्या मोहिमेवर काम करत आहे'

आरबीआयकडून (Reserve Bank of India ) रिव्हर्स रेपो दर ४ टक्क्यांवरुन ३.७५ वर आणला आहे. त्यामुळे ठेवीदारांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ठेवीवरील व्याज दरात कपात होण्याची शक्यता आहे. काही बँकांनी आधीच ठेवीवरील व्याजदरात कपात केली आहे. आता पुन्हा  रिव्हर्स रेपो दरात कपात केल्याने याचा फटका खातेधारकांना बसणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, कोरोना विषाणूमुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. आरबीआय आपल्यावतीने शक्य ते सर्व करत आहे. कोरोनाचा परिणाम लक्षात घेता आरबीआय पूर्णपणे तयार आहे.

विकास दराच्या अंदाजावर ते म्हणाले, 'भारताचा विकास दर १.९टक्के आहे. जी -२० मध्ये भारताचा विकास दर सर्वोत्कृष्ट असेल अशी अपेक्षा आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी मंदी असू शकते.  रोख रकमेची कमतरता भासणार नाही. एनबीएआरडी, सिडबी, एनएचबीला  ५०,००० कोटी रुपये देत आहेत जेणेकरुन त्यांना पुढील कर्ज देता येईल. '

ते पुढे म्हणालेत, आरबीआयच्या १५० अधिकारी, कर्मचार्‍यांच्या टीमचे मी कौतुक करतो आणि आभार मानू इच्छितो, जे क्वारंटाईनमधील त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर आहेत आणि  २४ तास कर्तव्यावर आहेत जेणेकरुन आवश्यक सेवा सुरु राहिल्या आहेत.