RBI चे पतधोरण जाहीर! व्याजदरांमध्ये कोणतेही बदल नाही; GDP 9.5 % राहण्याचा अंदाज

रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गवर्नर शक्तिकांत दास यांना शुक्रवारी पतधोरण (MP) जारी केले. पतधोरण समितीने (MPC)पॉलिसी दरांमध्ये कोणतेही बदल केलेले नाही

Updated: Aug 6, 2021, 11:16 AM IST
RBI चे पतधोरण जाहीर! व्याजदरांमध्ये कोणतेही बदल नाही;  GDP 9.5 % राहण्याचा अंदाज title=

मुंबई : रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गवर्नर शक्तिकांत दास यांना शुक्रवारी पतधोरण (MP) जारी केले. पतधोरण समितीने (MPC)पॉलिसी दरांमध्ये कोणतेही बदल केलेले नाही. रेपो रेट 4 टक्क्यांवर जैसेथे ठेवण्यात आले आहेत. रिझर्व बँकेचे गवर्नर दास यास यांनी म्हटले आहे की, समितीने एकमताने पॉलिसीच्या दरांमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिवर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवरच राहणार आहे. मार्जिनल स्टॅंडिंग फॅसिलिटी रेट (MSFR) आणि बॅंक रेट 4.25 टक्के राहणार आहे. रिझर्व बँकेच्या गवर्नर यांनी पतधोरणाची दिशा अकोमोडेटिव ठेवली आहे. RBI ने सलग 7 वेळा व्याजदरात कोणतेही बदल केलेले नाहीत.

पतधोरण समितीच्या मते, 'अर्थव्यवस्था प्रगती करीत आहे. तसेच अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी पतधोरणाचा आधार गरजेचा आहे. रिझर्व बँकेचे लक्ष मागणी, पुरवठा चांगला कऱण्यावर आहे. लसीकरणामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची आशा आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे.  लसीकरण वाढल्याने आर्थिक व्यवहारांमध्ये गती येत आहे'.

गवर्नर दास यांनी म्हटले की, 'मे मध्ये वाढलेल्या महागाई दराने(CPI)सरप्राइज केले आहे. प्राइज मोमेंटम मॉडरेट राहिले आहे. डिमांड आऊटलूकमध्ये सुधारणा झाली आहे. परंतु परिस्थिती सामान्य होण्याला आणखी काही वेळ लागू शकतो. मागणी पुरवाठ्याचे संतुलन ठेवण्यासाठी उपाययोजना करव्या लागतील. जूनमध्ये महागाई दर जास्त आहे. RBI गवर्नर यांनी FY21-22 साठी WPI च्या दराचे लक्ष 5.7 टक्के ठेवले आहे. तसेच 2021-22 या आर्थिक वर्षात GDP ग्रोथ 9.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.'