काय आहे 'आभा हेल्थ कार्ड'? आता डॉक्टरकडे जाताना जुन्या रिपोर्टची कटकट नाही

(Health Sector) आरोग्य विभागातील एका नव्या पर्वाची सुरुवात केंद्र सरकारकडून (Modi Government) करण्य़ात आली आहे. नुकतंच केंद्राकडून आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट आभा (ABHA) म्हणजेच डिजिटल हेल्थ कार्ड (Digital health card) लॉन्च केलं आहे. 

Updated: Nov 5, 2022, 09:21 AM IST
काय आहे 'आभा हेल्थ कार्ड'? आता डॉक्टरकडे जाताना जुन्या रिपोर्टची कटकट नाही  title=
read all details and benefits of abha health card

Abha Health Card : (Health Sector) आरोग्य विभागातील एका नव्या पर्वाची सुरुवात केंद्र सरकारकडून (Modi Government) करण्य़ात आली आहे. नुकतंच केंद्राकडून आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट आभा (ABHA) म्हणजेच डिजिटल हेल्थ कार्ड (Digital health card) लॉन्च केलं आहे. सोप्या शब्दांत सांगावं तर हे कार्ड प्रत्येक व्यक्तीबाबत त्यांच्या आरोग्यासंबंधित माहिती डिजिटल स्वरुपात संग्रहित करुन ठेवणार आहे. या कार्डची नोंदणी करतेवेळीच आजार आणि त्यावरी उपचाराची माहिती घेतली जाणार आहे. (read all details and benefits of abha health card )

(What is Abha card?) आभा हे एक डिजिटल स्वरुपातील कार्ड आहे. यामध्ये कोणत्याही रुग्णाच्या आजाराची माहिती आणि त्याच्या उपचार पद्धतीची नोंद केली जाणार आहे. ज्यामुळे सदर रुग्णाची medical history तपासणं अधिक सोपं होणार आहे. या 14 आकडे असणाऱ्या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा युनिक आयडी तयार होणार आहे. 

अधिक वाचा : Dengue Fever : डेंग्यूच्या रुग्णांनी 'हे' ज्यूस प्यावेत, पटकन वाढतील प्लेटलेट्स

 

आता डॉक्टरकडे जाताना जुने रिपोर्ट नकोच.... 

सध्याच्या घडीला तुम्ही कोणत्याही आजार किंवा व्याधीसाठी डॉक्टरकडे गेलं असता यापूर्वी तुम्ही कुठे उपचार घेत होतात का, असल्यास त्याचे रिपोर्ट दाखवा अशी विचारणा रुग्णांकडे केली जाते. पण, आभा कार्डमुळे आता ही मागणीही केली जाणार नाही. कारण, या एका कार्डमध्ये तुम्हाला असणाऱ्या व्याधी, तुमच्या शरीरातील महत्त्वाच्या आणि आवश्यक गोष्टींची नोंद आणि संपूर्ण उपचार पद्धतीच्या माहितीची नोंद असणार आहे. आभा कार्डच्या उपलब्धतेमुळे कोणीही व्यक्ती देशामध्ये कोणत्याही शहरात उपचार घेऊ शकणार आहे. 

कसं काढाल कार्ड? (How to get ABHA card?) 

सध्या प्राथमिक स्वरुपात जनआरोग्य योजना कार्यालयातर्फे रुग्णालयं आणि शासकीय कार्यालयांमध्ये या कार्डसाठीची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीनं हे कार्ड काढायचं झाल्यास तुम्हाला ndhm.gov.in या संकेतस्थळाला (Website) भेट द्यावी लागणार आहे. यामध्ये Creat health id या पर्यायावर क्लिक करा. आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक दिल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल आणि पुढच्याच टप्प्यात तुमचं आभा कार्ड जनरेट झालेलं असेल.