Dengue Fever : डेंग्यूच्या रुग्णांनी 'हे' ज्यूस प्यावेत, पटकन वाढतील प्लेटलेट्स

डेंग्युमुळे प्लेटलेट्स कमी झाल्यात, फक्त हे तीन ज्यूस पिऊन बघा 

Updated: Nov 4, 2022, 11:55 PM IST
Dengue Fever : डेंग्यूच्या रुग्णांनी 'हे' ज्यूस प्यावेत, पटकन वाढतील प्लेटलेट्स  title=

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक शहरात डेंग्यूने (Dengue Fever) नाक वर काढले आहे. त्यामुळे अनेक शहरात डेंग्यूचा (Dengue) आकडा वाढत चालला आहे. रूग्णांमध्ये देखील या आजाराची भीती वाढत चालली आहे. डेंग्यू ताप आल्यावर शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. जर रुग्णाच्या प्लेटलेट्स सतत कमी होऊ लागल्या तर समस्या गंभीर आहे कारण त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. डेंग्यू तापात प्लेटलेट्स (Platelet) कमी होणे कठीण होऊ नये. यासाठी आम्ही असे काही घरगूती उपाय सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही घरच्या घरी म्हणजेच 2-3 दिवसात रुग्णाच्या प्लेटलेट्स कमी होण्यावर नियंत्रण ठेवू शकता.

शेळीचे दूध

शेळीच्या दुधात जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जे रोगांशी लढण्यासाठी खूप प्रभावी आहे. शेळीच्या दुधात बी6, बी12, व्हिटॅमिन डी, फॉलिक अॅसिड आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हेच कारण आहे की शेळीचे दूध धोकादायक रोगांशी लढण्यासाठी खूप प्रभावी आहे.
 

गुळवेळचा रस

डेंग्यू तापामध्ये (Dengue Fever) प्लेटलेटची (Platelet) संख्या वाढवण्यासाठी गुळवेळचा रस हा सर्वोत्तम मार्ग आहे. गुळवेळचा रस प्यायल्याने प्लेटलेट्स सहज वाढवता येतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गुळवेळचा रस डेंग्यूमध्ये औषधापेक्षा जास्त फायदेशीर आहे आणि रुग्ण लवकर बरा होतो.

पपईच्या पानांचा रस

डेंग्यूच्या (Dengue Fever) विषाणूमध्ये पपईच्या पानांचा रस देखील खूप फायदेशीर आहे. जर तुमच्या घरात डेंग्यूचा रुग्ण असेल तर पपईच्या पानांचा रस बनवून प्या. एक ते दोन दिवसात तुम्हाला फायदा दिसेल.