कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

कोकण रेल्वेत भर्ती

Updated: Jun 12, 2018, 08:34 PM IST
कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी title=

मुंबई : जर तुम्ही 10 वी पास आहात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर रेल्वेत नोकरी करु इच्छित असाल तर परीक्षा आणि मुलाखत न देता नोकरीची सुवर्णसंधी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने ट्रॅकमॅन, पॉइंट्समॅन आणि खलासी पदांसाठी भर्ती काढली आहे. तुम्ही या पदासाठी ऑनलाईन अर्ज करु शकता. 6 जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करु शकता. 

विभागाचं नाव - कोकण रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेड

पदांची नावं - ट्रॅकमॅन, पॉइंट्समॅन आणि खलासी

पदांची संख्‍या - 100

शिक्षण - 10 वी

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 जुलै 2018

उमेदवाराचं वय 18 ते 31 मध्ये असावं

निवड प्रक्रिया- कंप्यूटर बेस्ड टेस्ट, फिजिकल एफिसिएंशी टेस्ट, मेडिकल एग्जामिनेशन आणि डाक्यूमेंट्स वेरिफिकेशनच्या आधारावर निवड

कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही अर्ज करु शकता.