Reliance JIO Success Story : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे नाव फक्त भारतीय उद्योग जगतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात अनेकांनाच ठाऊक असून, त्यांच्या या क्षेत्रातील योगदानानं अनेकजण भारावल्याचं कायमच पाहायला मिळतं. नाव घ्याल त्या क्षेत्रात आपल्या व्यवसायाला उल्लेखनीय उंचीवर पोहोचवणाऱ्या या मुकेश अंबानी यांच्या बाबतीत अनेकदा परिसस्पर्शाचं उदाहरण दिलं जातं आणि अनेकदा ते खरंही ठरतं. कारण, अनुभवाच्या बळावर ते कायमच यशशिखरं गाठताना दिसतात. याच मुकेश अंबानी यांच्या नावे जगातील सर्वाधिक यशस्वी टेलिकॉम कंपनीचीही नोंद आहे. ही कंपनी म्हणजे रिलायन्स जिओ.
2016 मध्ये भारतात Free 4G डेटा सुविधा देत रिलायन्स जिओनं टेलिकॉम जगतामध्ये सर्वांनाच हैराण केलं होतं. जगभरात भारत एक असं राष्ट्र आहे जिथं आजगी सर्वाधिक ब्रॉडबँड डेटा वापरला जातो आणि यामागचं सर्वात महत्त्वाचं रिलायन्स जिओ.
मुकेश अंबानी यांनी त्यांच्या संपत्तीची वाटणी झाली त्याक्षणी रिलायन्स टेलिकॉम कंपनी धाकटे बंधू अनिल अंबांनी यांना दिली होती. त्यानंतर 2018 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान मुकेश अंबानी यांनीच खुलासा करत सांगितलं, की त्यांची लेक ईशा अंबानी हिनं एकदा इंटरनेटच स्पीड अतिशय रेगांळत असल्याची कर्रार केली आणि इथून त्यांना जिओ सुरू करण्याची कल्पना सुचली.
2011 मध्ये अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेली ईशा भारतात परतली होती. सुट्टीसाठी परतलेली ईशा ईंटरनेच्या तक्रारीमुळं तिचा अभ्यास पूर्ण करू शकत नव्हती आणि ईशाची हीच अडचण पाहून मुकेश अंबानी यांनी Fast Internet ची गरज लक्षात घेतली.
दरम्यान याआधीच आकाशनं ईशाआधीच मुकेश अंबानी यांना डिजिटल माध्यमांसंदर्भात माहिती देत अनेक कामं याच माध्यमातून होत असल्याचं सांगितलं होतं. अनेक कामं ऑनलाईन पद्धतीनं होत असल्याचं सांगत आकाशनं वडिलांना सर्व कामं कशा पद्धतीनं होतात आणि त्यांचा नेमका फायदा काय याची माहिती दिली आणि इथूनच मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा टेलिकॉम क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली. 2010 मध्येच त्यांनी इन्फोटेल ब्रॉडबँड सर्विसेस नावाच्या कंपनीतून 95 टक्के शेअर खरेदी केले. या कंपनीनं देशातील 22 भागांमध्ये 4G ब्रॉडबँडची सुविधा दिली होती.
पुढे... पुढे काय? आयबीएसएल कंपनीला 4800 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्यानंतर मुकेश अंबानी यांनी या कंपनीला रिलायन्स जिओ असं नाव दिलं आणि ही कंपनी पुढे जाऊन जिओ टेलिकॉम म्हणून ओळखली गेली. आजच्या घडीला या कंपनीनं 48 कोटी ग्राहकांना सेवा दिली असून, हा आकडा आणि कंपनीचा नफा वाढतच चालला आहे. आकाशनं दाखवलेली वस्तुस्थिती आणि लेकिला भासलेली गरज यातून मुकेश अंबानी यांनी सुरु केलेला प्रवास किती इतक्या कमाल वेगानं यशाच्या वाटेवर गेला की पाहणारे हैराणच झाले.