आज दिसणारं वैभव त्यांच्यामुळेच; 'या' व्यक्तीचा शब्द अंबानी कुटुंबासाठी प्रमाण; हे आहेत तरी कोण?

आज दिसणारं वैभव त्यांच्यामुळेच... 

Updated: Jun 7, 2022, 03:18 PM IST
आज दिसणारं वैभव त्यांच्यामुळेच; 'या' व्यक्तीचा शब्द अंबानी कुटुंबासाठी प्रमाण; हे आहेत तरी कोण?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : भारतीय उद्योग जगतामध्ये काही नावांना मानाचं स्थान आहे. अशा मंडळींच्या यादीत मुकेश अंबानी आणि एकंदरच अंबानी कुटुंबाच्या नावालाही कमाल वजन प्राप्त आहे. फक्त व्यावसायिक क्षेत्र आणि उद्योगजगतामध्येच नव्हे तर इतरही बऱ्याच क्षेत्रांत हे कुटुंब सक्रिय आहे. 

एकिकडे नफ्याचा आलेख उंचावणाऱ्या या कुटुंबाचा धार्मिक आणि अध्यात्मिक गोष्टींवरही तितकाच विश्वास. असं म्हणतात, गुरुची साथ असल्यास आपल्याला संकटांचा महासागरही ओलांडता येतो. (reliance Mukesh ambani Family guru ramesh bhai oza)

अनेकांसाठी तर गुरुच सर्वकाही असतो. गुरुचा शब्द प्रमाण असतो. अंबानी कुटुंबाच्या बाबतीतही असं बऱ्याचदा घडतं जेव्हा त्यांचे गुरु त्यांना मोलाचा सल्ला देतात. 

सूत्रांच्या माहितीनुसार रमेशभाई ओझा हे या धनाढ्य कुटुंबाच्या गुरुस्थानी आहेत. अंबानी कुटुंबीय त्यांच्या  कुटुंबाशी संबंधीत कोणताही लहानमोठा निर्णय गुरुंच्या आज्ञेनंतरच घेतात. 

रमेशभाई ओझा हे एक अध्यात्मिक गुरु आहेत. गुजरातमधील पोरबंदर इथं त्याचा आश्रम आहे. 'संदीपनी वि‍द्यानि‍केतन आश्रम' असं या आश्रमाचं नाव. धीरुभाई अंबानी यशशिखरावर पोहोचले त्या क्षणापासून रमेशभाई अंबानी कुटुंबासोबत आहेत. 

उद्योगामध्ये काय करावं, काय करु नये इथपासून कौटुंबीक वाद कसे मिटवावेत इथपर्यंतचे सल्ले अंबानी कुटुंबीय रमेश भाई यांच्याकडून घेत असतं. मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात मतभेदाची ठिणगी पडल्यानंतर कोकिलाबेन यांच्या सांगण्यावरून खुद्द ओझा यांनीच त्यांची जबाबदारी निभावत हा वाद मिटवला होता. 

एकदा कोकिलाबेन यांनी घरी  'राम कथा' कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्याचवेळी रमेशभाई तिथं आले होते. त्यादरम्यान अंबानी कुटुंबाशी त्यांचं नातं अणखी घनिष्ट झालं. रमेशभाई यांचा शब्द अंबानी कुटुंबासाठी प्रमाण आहे. 

जामनगर येथील रिलायन्स समुहाच्या रिफायनरीच्या उदघाटनासाठी रमेशभाई यांची हजेर होती, इतकंच नव्हे तर त्यांच्या हस्ते या रिफायनरीचं उदघाटन करण्यात आलं होतं यावरूनच अंबानींसाठी ते किती महत्त्वाचे आहेत हे स्पष्ट झालं.