महागाई रोखण्यात सरकार अपयशी, महागाई ३.३६ टक्कांनी वाढली

 किरकोळ बाजारात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्यामुळे सामान्यांचे हाल होत आहेत. दरम्यान, महागाई रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचे दिसत आहे. रिटेल चलनवाढीचा दर ऑगस्टमध्ये पाच महिन्यांतील उच्चांकी स्तरावर वाढून ३.३६ टक्के झाला आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 13, 2017, 05:42 PM IST
महागाई रोखण्यात सरकार अपयशी, महागाई  ३.३६ टक्कांनी वाढली title=

नवी दिल्ली : किरकोळ बाजारात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्यामुळे सामान्यांचे हाल होत आहेत. दरम्यान, महागाई रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचे दिसत आहे. रिटेल चलनवाढीचा दर ऑगस्टमध्ये पाच महिन्यांतील उच्चांकी स्तरावर वाढून ३.३६ टक्के झाला आहे. 

भाज्या आणि फळे यांच्या किरकोळ किमतीत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर २.३६टक्के होता. मार्च २०१७ नंतर ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई सर्वाधिक आहे. त्या वेळी ती ३.८९ टक्के होती. सध्या सुखे खोबरे १२० रुपयांवरुन थेट २०० ते २४० रुपयांवर पोहोचले आहे.

आकडेवारी काय सांगतात?

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये अन्नधान्य चलनवाढीचा दर १.५२ टक्क्यांवर पोहोचला होता. पूर्वी त्यात अस्थिरता होती. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने (सीएसओ) जारी केलेल्या आकडेवारीनुसार दर महिन्याला दररोज फळे आणि भाजीपाला खरेदी केल्यामुळे अनुक्रमे ५.२९ टक्के आणि ६.१६टक्क्यांनी वाढ झाली आहे. तो जुलैमध्ये २.८३ टक्के आणि शून्य ते ३.५७ टक्के कमी होता.

त्याचप्रमाणे अन्नधान्य, स्नॅक (रिफ्रेशमेंट), मिठाई यांच्यात महागाईचा दर ऑगस्टमध्ये वाढून १.९६ टक्के झाला, जो जुलैमध्ये ०.४३ टक्के होता. त्याचप्रमाणे वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रात महागाईत वाढ होऊन ते ३.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो जुलैमध्ये १.७६ टक्के होता. याशिवाय, कडधान्ये आणि उत्पादने, मांस आणि मासे, तेल आणि चरबी यांची चलनवाढ कमी झाली यात अनुक्रमे ३.८७ टक्के, २.९४ टक्के आणि १.०३ टक्के वर आली.