६५व्या वर्षी डॉक्टर होणार सेवानिवृत्त; केंद्र सरकारचा निर्णय

देशभरात आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 27, 2017, 11:39 PM IST
६५व्या वर्षी डॉक्टर होणार सेवानिवृत्त; केंद्र सरकारचा निर्णय title=

नवी दिल्ली : देशभरात आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सरकारने घेतलेला निर्णय भारतीय रेल्वे, केंद्रीय विद्यापीठे आणि भारतीय प्रोयोगिक संस्थांसारख्या स्वायत्त शिक्षणसंस्था, पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया यांसारख्या संस्था, विविध मंत्रालयांची आणि विभागांच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेले सर्व डॉक्टर्स तसेच, कुटूंब कल्याण मंत्रालयातील डॉक्टरांसाठी लागू असेल.

या निर्णयाचे स्वागत करत भारतीय वैद्यकीय सेवेमध्ये या निर्णयामुळे महत्त्वपूर्ण फायदा होईल असे केंद्रीय आरोग्य आणि कुटूंबकल्याणमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटले आहे.