रोहिंग्या भारतात येण्यामागे मोठ्ठा कट - आरएसएस

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं रोहिंग्या मुसलमानांच्या बाबतीत नरेंद्र मोदी सरकारचं उघडपणे समर्थन केलंय. इतकंच नाही तर रोहिंग्या मुसलमान भारतात येण्यामागे मोठ्ठा कट असल्याचंही आरएसएसचं म्हणणं आहे. 

Updated: Oct 14, 2017, 05:35 PM IST
रोहिंग्या भारतात येण्यामागे मोठ्ठा कट - आरएसएस title=

भोपाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं रोहिंग्या मुसलमानांच्या बाबतीत नरेंद्र मोदी सरकारचं उघडपणे समर्थन केलंय. इतकंच नाही तर रोहिंग्या मुसलमान भारतात येण्यामागे मोठ्ठा कट असल्याचंही आरएसएसचं म्हणणं आहे. 

संघाचे कार्यकर्ते सुरेश भय्याजी जोशी यांनी रोहिंग्या मुसलमानांवर संघाचं म्हणणं मांडलं. 'म्यानमार सरकारद्वारे रोहिंग्या मुसलमानांना देशातून बाहेर काढण्यामागेही मोठी कारणं आहेत. कुणीही कोणत्याही कारणाशिवाय एवढ्या मोठ्या स्तरावर रोहिंग्या मुसलमानांविरोधात निर्णय घेऊ शकत नाही' असं म्हणत रोहिंग्यांच्या भारतातील प्रवेशावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 

रोहिंग्या मुसलमान केवळ जम्मू आणि हैदराबादमध्येच का जात आहेत? त्यांना आधारकार्ड आणि मतदान ओळखपत्र कसं प्राप्त होतंय? असे प्रश्न उपस्थित करतानाच जोशी यांनी 'मानवतेच्या आधारावर रोहिंग्या मुसलमानांना मदत करण्यावर आम्हाला कोणताही आक्षेप नाही... परंतु, मानवतेच्या आधारावर दिली जाणारी मदत सीमित असायला हवी. रोहिंग्यांना एका निश्चित वेळेसाठी सीमेवर शरण देण्यास काहीच हरकत नाही, असं म्हटलंय.