मुंबई : नवीन नोकरी म्हणजे नवीन संधी. पण मित्रांनो, नवीन नोकरी म्हणजे पगारवाढ पण, बरोबर ना? नवीन नोकरीत साधारण आपल्याला 10%, 15% किंवा जास्तीत जास्त 20% हाइक मिळते. सध्या तुम्ही नवीन नोकरीसंदर्भात कुठल्या ऑफिसमधील HR शी बोलत आहात का? अनेकांना नवीन ठिकाणी HR सोबत पगारासंदर्भात निगोशिएशन करताना अडचणी येतात. त्यामुळे अनेकांच्या हातात निराशा येते. मग अशावेळी एक तर जे मिळालं त्यात समाधान मानून तुम्ही ती संधी स्विकारता किंवा त्या नोकरीला नकार देतात.
पण सोशल मीडियावर तुमच्या या अडचणीवर एक सुपरडुपर आयडिया व्हायरल होतो आहे. सोशल मीडियावर सॅलरी निगोशिएशनवरुन एक पोस्ट तुफान गाजतेय. एका तरुणाने सॅलरी निगोशिएशनसंदर्भात भन्नाट आयडिया दिली आहे. ती आयडिया ऐकून तुम्ही हसून लोटपोट व्हाल.
तो तरुण म्हणतो, ''सॅलरी निगोशिएशनच्या इंटरव्यूसाठी मी माझ्या आईला सोबत घेऊन येऊ शकतो का? कारण ती जबरदस्त निगोशिएशन करु शकते.'' सॅलरी निगोशिएशनसाठी आईला घेऊन जाण्याचा सल्ला हा तरुण देतोय. LinkedIn या सोशल मीडियावर त्या तरुणाने ही पोस्ट टाकली आहे. त्यानंतर या पोस्टवर जे काही कंमेट्स आले ते वाचून तर हसून हसून तुमचं पोट दुखल्याशिवाय राहणार नाही.
त्या तरुणाने हॅशटॅग Underrated Skill In Tech सोबत या आयडियाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर या पोस्टवर हजारो युजर्स रिएक्ट केलंय. ''आई ही बेस्ट Bargainer आहे'' असं म्हटलं आहे. एक जण तर म्हणतो, 'सॅलरी निगोशिएशनसाठी आई ही परफेक्ट चॉइस आहे.'
एक यूजर म्हणतो, ''जर माझी आई सॅलरी निगोशिएट करायला सुरु करेल, तर HR बेशुद्धच पडेल.'' तर दुसरा यूजर म्हणतो, ''माझी आई तर 150% हाइक मागेल.'
ट्विटरवर एका यूजरने लिहिलंय, ''माझी आई HR ला म्हणेल मिनिमम 150 टक्के हाइक तर द्यावी लागेल, नाही तर मी दुसरीकडे जाईल. तू एकटा रिक्रूटर नाही आहेस.'' तर दुसरा यूजर म्हणतो, ''आई म्हणणार पैसे डबल.''
ही पोस्ट नितेश यादव नावाच्या तरुणाने शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनंतर काही यूजर्सने महिलांच्या Bargainer बद्दल कौतुक केलं आहे. आपण कायम लहानपणापासून पाहत आलो आहोत, आपल्या आयाबहिणी मार्केटमध्ये गेल्यावर ज्या काही विशिष्ट प्रकारे Bargainer करतात, त्याला कुठेच तोड नाही. मग जर आता तुम्ही नवीन नोकरीसाठी कुठे HRशी सॅलरी निगोशिएशनसाठी जाणार असाल तर आईला नक्की घेऊन जा.