जोधपूर : अभिनेता सलमान खानच्या जामीनावर सुनावणी पूर्ण झाली आहे, मात्र जामीवरील निर्णय दुपारी देण्यात येण्याची शक्यता आहे. कारण दुपारच्या जेवणानंतर सलमानच्या जामीनावर निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सलमानच्या जामीनाबाबत अनिश्चितता कायम आहे. काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानविरोधातील आरोपावर राजस्थानच्या जोधपूरमधील कोर्टात ही सुनावणी सुरू आहे, सलमान खान या प्रकरणी मागील २ दिवसापासून जोधपूर जेलमध्ये बंद आहे. न्यायमूर्ती रवींद्र कुमार जोशी यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात सलमान खानचा जेलमध्ये मुक्काम वाढणार किंवा नाही, याविषयी त्याच्या फॅन्सना उत्सुकता लागून आहे. सलमानच्या जामीनाला सरकारी वकिलांनी विरोध केला आहे.
संबंधित बातम्या