समाजवादी पक्षाने स्टार प्रचारकांच्या यादीतून मुलायमसिंहांना वगळले

मुलायम सिंह यादव यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तूळात चांगलीच चर्चा रंगत आहे.

Updated: Mar 24, 2019, 01:06 PM IST
समाजवादी पक्षाने स्टार प्रचारकांच्या यादीतून मुलायमसिंहांना वगळले title=

लोकसभा निवडणुक २०१९ चा बिगूल आखेर वाजला. एकूण ७ टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे जाहीर होताच देशभरात आचारसंहिता लागू झाल्या. शनिवारी समाजवादी पक्षाने त्यांच्या प्रचारकांची यादी जाहिर केली. पक्षाने जाहीर केलेल्या नावामध्ये एक महत्वाची बाब समोर आली आहे. ती म्हणजे प्रचारकांच्या यादी मध्ये समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांचे नाव यादीत नाही. पक्षच्या यादीमध्ये एकूण 40 प्रचारकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. परंतू यादीत मुलायम सिंह यादव यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तूळात चांगलीच चर्चा रंगत आहे.

यादी मध्ये सर्वात पहिले नाव समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांचे आहे. दुसऱ्या स्थानी राम गोपाल वर्मा विराजमान आहेत. यांच्या व्यतिरिक्त यादीमध्ये आजम खान, जया बच्चन, डिंपल यादव आणि तेजप्रताप यादव यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. एसपी प्रवक्ता राजेंद्र चौधरी आणि विरोधी पक्ष नेता राम गोविंद चौधरी सुद्ध प्रचारकांच्या यादी मध्ये आहेत. यादीमध्ये तीन राज्यसभा संसद जावेद अली खां, विश्वंभर प्रसाद निषाद आणि सुरेंद्र नागर यांना सुद्धा जागा मिळाली आहे. 

विधान परिषदेतील सहा सदस्यांना सुद्ध प्रचारकांच्या यादीमध्ये शामिल करून घेण्यात आले. सहा विधान परिषदेतील सदस्यांमध्ये परवेज अली, संजय लाठर, जितेंद्र यादव, राकेश यादव, आशु मलिक आणि राजपाल कश्यप आहेत. याआधी बहुजन पक्षाने सुद्धा त्यांच्या प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

तर दुसरीकडे शनिवारी शिवपाल यादव यांच्या समाजवादी पक्षाने प्रचारकांची यादी जाहीर केली. पण जाहीर केलेल्या यादीत वरिष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांचे नाव वगळण्यात आले आहे. 

शिवपाल यांनी जाहीर केलेल्या यादीत प्रथम नाव खुद्द शिवपाल सिंह यांचे असून दुसरे नाव त्यांचा मुलगा आदित्य यादव यांचे आहे. त्याच्या एक दिवस आधी मायावतींनी त्यांच्या 20 प्रचारकांची यादी जाहीर केली. यादी मध्ये मायावती, सतीश मिश्रा यांच्या व्यतिरिक्त मायावतींचा भाचा आकाश आनंद यांचे सुध्दा नाव आहे.