अर्णब गोस्वामी यांची तुलना महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेलांशी

  रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी हे सध्या अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी तुरुंगात आहेत. 

Updated: Nov 10, 2020, 04:48 PM IST
अर्णब गोस्वामी यांची तुलना महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेलांशी title=

नवी दिल्ली :  रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी हे सध्या अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी तुरुंगात आहेत. अर्णब गोस्वामी यांच्या पाठीमागे भाजपाचे काही नेते उभे ठाकले आहेत. दुसरीकडे अन्वय नाईक यांच्या पत्नीने सत्याला न्याय द्या, सत्याच्या पाठीमागे उभे राहा असं आवाहन जनतेला केलं आहे. दुसरीकडे संबित पात्रा या भाजपा प्रवक्त्यांनी अर्णब गोस्वामी यांची तुलना थेट महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्याशी केली आहे.

नेल्सन मंडेला आणि महात्मा गांधी यांच्याप्रमाणे अर्णब गोस्वामी यांना त्रास सहन करावा लागला. मात्र भविष्यात अर्णब गोस्वामी हे आपल्याला एका नवीन स्वरुपात नक्कीच दिसतील. एवढंच नाही तर तुरुंगाबाहेर आल्यानंतर ते प्रसारमाध्यमांचा चेहरा मोहरा बदलून टाकतील आणि प्रसारमाध्यमांचे नेल्सन मंडेला ठरतील, असं संबित पात्रा यांनी म्हटलं आहे.

अर्णब यांना नक्कीच न्याय मिळेल, सर्वच गोष्टी टीव्हीवर सांगता येत नाहीत, भारतीय संविधानावर विश्वास ठेवा, मी भाजपावर किंवा सरकारवर विश्वास ठेवाच असं सांगत नाही. कारण या दोन्ही गोष्टी संविधानानुसारच काम करतात. अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक ही त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्यासारखी असल्याचं अर्णब गोस्वामी यांनी म्हटलं आहे.