कानपुर : घटना आहे 25 ऑक्टोबर 2022 ची. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ आहे कानपूरमधील गुलमोहोर पार्क भागातील. वेळ दुपारी 12.30 वाजताची. इथे घरात एक अतिशय विचित्र घटना घडली. या घरातील एका खोलीत एक बेड होता, बेडवर ठेवलेली प्लॅस्टिकची खुर्ची होती. बेडवर गादीही होती. ज्यामुळे खुर्चीचा कदाचित बॅलन्स राहत नव्हता. बेडच्या बरोबर वर एक पंखा होता आणि पंख्याला लटकलेली ओढणी होती.
या सर्व निर्जीव वस्तूंमध्ये होती ती. ती खुर्ची, पंखा किंवा ओढणी यांच्यामध्ये वावरत होती. कधी ती फांद्यासारखा वापर करत असलेल्या ओढणीला ठीक करायची, कधी खुर्चीवरून खाली उतरायची, कधी काहीतरी पुटपुटायची. बरं हा व्हिडीओ पाहून हे स्पष्ट स्पस्ट होतं की त्या खोलीत आणखी कुणीतरी आहे, जो हा संपूर्ण व्हिडीओ शूट करत आहे. त्या इसमाचा आवाजही या व्हिडिओतमध्ये ऐकायला येतोय.
व्हिडिओमध्ये ऐकू येणाऱ्या आवाजात तो इसम काहीतरी बोलतो आणि त्यावर ती महिला उत्तरही देते. हा व्हिडीओ केवळ एवढाच आहे. मात्र स्टोरी याही पुढे सुरु होते. हा व्हिडीओ बनवण्याच्या तब्बल दोन तासानंतर व्हिडीओ बनवणारा एक फोन करतो आणि शोभिताने आत्महत्या केली आहे असं सांगतो.
होय आत्महत्या! व्हिडिओमध्ये जी महिला बेडवर, बेडवरील खुर्चीवर चढताना उतरताना दिसते तिचं नाव शोभिता आहे. शोभाताच्या आत्महत्येआधी तिचा व्हिडीओ शूट करणारा व्यक्ती आहे संजीव गुप्ता. संजीव आणि शोभिता नवरा बायको आहेत. याचाच अर्थ जेंव्हा शोभिता हा सर्व प्रयत्न करत होती तेंव्हा संजीव तिचा व्हिडीओ शूट करत होता. स्वतःच्या बायकोला वाचवायचं सोडून हा व्हिडीओ का बनवत आहे असा प्रश्न तुम्हला नक्की पडेल. मात्र यामागेही एक गोष्ट लपली आहे. ती कहाणी जाणून घेण्याआधी शोभिताच्या मृत्यूमागची संपूर्ण गोष्ट जाणून घेऊयात. व्हिडीओ शूट केल्याच्या तब्बल दोन तासानंतर दुपारी अडीच वाजता संजीव आपल्या सासरी फोन करतो आणि शोभिताच्या मृत्यूची बातमी देतो. अर्थात जावयाचा असा फोन आल्यावर शोभिताच्या आई वडिलांनाही धक्का बसतो आणि ते तात्काळ शोभिताच्या घरी पोहोचतात.
घरी येऊन पाहतात तर शोभिताचा मृतदेह बेडवर आहे आणि संजीव शोभितच्या छाती दाबून तिचा श्वास परत येतोय का हा प्रयत्न करताना पाहायला मिळतो. यानंतर लगेचच शोभिताला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं. इथे शोभिताचे घरचे पोलिसांना संपूर्ण कहाणी सांगतात. पोलिसांना तो व्हिडीओ देखील दाखवला जातो जो संजीवने तिच्या आई वडिलांना पाठवला. शोभिताच्या तक्रारीनंतर पोलीस तात्काळ संजीवला अटक करतात.
आता जाणून घेऊयात कहाणीचा दुसरा पैलू. संजीव शोभिताला वाचवायच्या आधी तिच्या मृत्यूच्या खटाटोप का रेकॉर्ड करत होता? शोभिता आणि संजीव यांचं लग्न पाच वर्ष आधी ऑक्टोबर 2017 मध्ये झालेलं. सुरुवातीपासूनच दोघांमध्ये खटके उडायचे. अशात शोभिताने अचानक असं पाऊल का उचललं हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. सांगितलं जातंय की हा व्हिडीओ शोभिताच्या मृत्यूआधी रेकॉर्ड केला होता. शोभिताच्या आत्महत्येच्या वेळचा कोणताही व्हिडीओ सध्यातरी उपलब्ध नाही. व्हिडीओवरील वेळ दुपारी साडेबारा वाजताची आहे आणि त्याने शोभिताच्या घरच्यांना दुपारी अडीच वाजता फोन केलेला. या घटनेमागे तब्बल दोन तासांचं अंतर आहे.
आता प्रश्न हा येतो की त्या दोन तासांत झालं काय? शोभिता जेंव्हा स्वतःचा जीव देत होती तेंव्हा कॅमेरा बंद करण्यात आलेला का? का तिच्यासोबत काहीतरी वेगळंच घडलं? शोभिताने खरंच आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली? पोलीस आता सर्व बाबींचा तास करत आहेत.