सुवर्णसंधी! तब्बल 5 वर्षांनंतर Indian Railway मध्ये मेगाभरती; स्पर्धा पूर्वीपेक्षाही अधिक आव्हानात्मक

Indian Railway : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी हवीये? संधी चालून आली आहे. कसा भराल अर्ज, किती असेल पगार? पाहा सविस्तर माहिती एका क्लिकवर   

सायली पाटील | Updated: Sep 13, 2024, 10:44 AM IST
सुवर्णसंधी! तब्बल 5 वर्षांनंतर Indian Railway मध्ये मेगाभरती; स्पर्धा पूर्वीपेक्षाही अधिक आव्हानात्मक  title=
sarkari naukri Indian railway rrb ntpc recruitment how to apply salary know details

Indian Railway : आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं आणि जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वे वाहतुकीचं जाळं अशी भारतीय रेल्वेची ओळख. देशातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या गावांना, जिल्ह्यांना आणि राज्यांना एकमेकांशी जोडणाऱ्या या रेल्वे विभागानं आजवर अनेकांना रोजगारही दिला आहे. हीच रेल्वे आता आणखी काहींनाही नोकरीची संधी देणार असून, तब्बल 5 वर्षांनंतर रेल्वेमध्ये इतक्या मोठ्या स्तरावर नोकरभरती होणार आहे. 

रेल्वेतील (Railwya Jobs) NTPC च्या साधारण 11000 हून अधिक पदांवर ही भरती होणार असून, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी असं या श्रेणीचं सविस्तर नाव, या पदांसाठी सध्या मोठ्या संख्येनं इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत अंडरग्रॅज्युएट श्रेणीतील 3445 पदांवर आणि ग्रॅज्युएट श्रेणीतील 8113 पदांवर भरती होणार आहे. ज्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आरआरबीच्या अधिकृत संकेतस्थळावर, indianrailways.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

भरतीसाठी पदं अनेक, पण प्रक्रिया सोपी नाही 

2019 मध्ये 35 हजार पदांसाठी झालेल्या भरतीसाठी साधारण 1 कोटी अर्ज आल्याचं सांगत यंदाच्या वेळी असणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अनेक परीक्षा आणि आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं इथंही त्यांची परीक्षाच आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. 

रेलवे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB)च्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या लघू सूचनेनुसार आरआरबी, एनटीपीसी भरती 2024 साठीची ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया 14 सप्टेंबर रोजी सुरु होणार असून, 13 ऑक्टोबर ही अर्ज नोंदणीची अंतिम तारीख आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिकलेले इच्छुक उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. 

रिक्त जागांविषयी सविस्तर माहिती 

ग्रॅज्युएट स्तरावरील पदं 

चीफ कमर्शिअल कम तिकीट सुपरवायजर- 1736 पदं 
स्टेशन मास्तर- 994 पदं 
गुड्स ट्रेन मॅनेजर- 3144 पदं 
ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट- 1507 पदं 
सिनियर क्लर्क कम टायपिस्ट- 732 पदं 

हेसुद्धा वाचा : सगळं सोडून आता बटर चिकन वादात पाकिस्तानची उडी; आता म्हणे 'आमच्या इथे...'

 

अंडरग्रॅज्युएट स्तरावरील पदं 

कमर्शिअल कम तिकीट क्लर्क - 2022 पदं 
अकाऊंट्स क्लर्क कम टायपिस्ट- 361 पदं 
ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट- 990 पदं 
ट्रेन्स क्लर्क - 72 पदं