Sarkari Naukri: कोणतीही परीक्षा न देता RBI मध्ये नोकरीची संधी! अर्जाची शेवटची तारीख 10 April; जाणून घ्या प्रक्रिया, पात्रता

Sarkari Naukri RBI Recruitment 2023: देशातील सर्व क्षेत्रामधील बँकांची शिखर बँक अशी ओळख असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी उपलब्ध असून यासंदर्भातील अर्ज बँकेने मागवले आहेत. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.

Updated: Mar 23, 2023, 09:28 PM IST
Sarkari Naukri: कोणतीही परीक्षा न देता RBI मध्ये नोकरीची संधी! अर्जाची शेवटची तारीख 10 April; जाणून घ्या प्रक्रिया, पात्रता
sarkari naukri rbi job

Sarkari Naukri RBI Recruitment 2023: देशातील सर्व बँकांची केंद्रीय बँक आणि देशातील बँकिंग व्यवस्थेवरील अग्रगण्य बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank Of India) नोकरभरती होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) फार्मासिस्ट पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. योग्य उमेदवाराला आरबीआच्या अधिकृत वेबसाईटवरुन या पदासाठी अर्ज करता येईल. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 25 जणांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल आहे.

आरबीआयमध्ये सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदांसाठी अर्ज भरुन सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्याचीही अंतिम तारीख 10 एप्रिल आहे. मात्र ही प्रक्रिया कशाप्रकारे पार पडणार, निवड कशी केली जाणार, या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे हे जाणून घेऊयात...

शैक्षणिक पात्रता

अर्जदारांची शैक्षिणिक पात्रता ही मेट्रिक किंवा त्या समान कक्षेपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे. फार्मसी अधिनियम 1948 अंतर्गत नोंदणीकृत मान्यता प्राप्त विद्यापिठातून फार्मसी विषयामध्ये डिप्लोमा किंवा त्याच स्तराची पदवी उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.

असे निवडणार उमेदवार

बँका शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांशी संपर्क साधेल. त्यानंतर उमेदवारांना सर्व शैक्षिणिक योग्यता (पोस्ट ग्रॅज्युएशन/ डिग्री / डिप्लोमा), वेगवेगळ्या बँकांपासून डिस्पेन्सरींचं अंतर, पीएसबी/पीएसयू/ सरकारी संघटना/ आरबीआय या सर्वांसंदर्भातील अनुभवाच्या आधारे पुढील फेरीसाठी उमेदवार निवडले जातील. सर्व निवडेलल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. मेडिकल टेस्ट आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडले. मात्र या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

10 एप्रिलआधी इथे पाठवा कागदपत्रं

सर्व कागदपत्रांच्या प्रतिंबरोबरच (झेरॉक्स कॉपींबरोबरच) उमेदवारी अर्जाचा फॉर्म श्रेत्रीय निर्देशक, मानव संशाधन प्रबंधन विभाग, भर्ती अनुभाग, भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई श्रेत्रीय कार्यालय, शहीद भगत सिंग रोड, फोर्ट मुंबई- 400001 या पत्त्यावर 10 एप्रिलपर्यंत सायंकाळी 5 वाजण्याच्या आधी पोहचेल अशा पद्धतीने पाठवावा. अधिक माहितीसाठी आरबीआयच्या rbi.org.in या वेबसाईटला भेट देऊ शकता.