#PulwamaAttack : ''कदाचित म्हणून त्यांनी... '' ; पुलवामा हल्ल्यावरुन मोदींवर सत्यपाल मलिक यांचा पुन्हा हल्लाबोल

Satya Pal Malik on Pulwama Attack : जम्मू काश्मीरचे (Jammu Kashmir) माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी पुलवामा हल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. 

Updated: Apr 18, 2023, 08:59 AM IST
#PulwamaAttack : ''कदाचित म्हणून त्यांनी... '' ; पुलवामा हल्ल्यावरुन मोदींवर सत्यपाल मलिक यांचा पुन्हा हल्लाबोल title=
Satya Pal Malik on Pulwama Attack claims pm narendra modi silenced told reason new Tweet

Satya Pal Malik on Pulwama Attack : केंद्राच्या चुकांमुळेच पुलवामा हल्ला (Pulwama Attack) झाल्याचं सांगितलं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला शांत राहण्यास सांगितलं असा धक्कादायक गौप्यस्फोट सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केला. त्यानंतर देशभरात एकच खळबळ माजलीच. पत्रकार करण थापर यांचा The Wire news पोर्टलसाठी दिलेल्या मुलाखत हा धक्कादायक खुलासा केला. त्यानंतर विरोधकही चांगलेच आक्रमक झाले. 

आता सत्यपाल मलिक यांनी अजून एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यांनी नरेंद्र मोदी यांचा निवडणुकी काळातील काश्मीरमधील सभेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ''शायद मुझे इसलिए चुप रखा गया था!'' ''कदाचित यासाठी मला शांत राहायला सांगितलं होतं वाटतं''

सत्यपाल मलिक यांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर #PulwamaAttack ट्रेंड होतं आहे. दरम्यान त्या मुलाखतीत सत्यपाल म्हणाले होते की, "सीआरपीएफ जवानांनी ताफा मोठा असल्याने जवानांना नेण्यासाठी एअरक्राफ्टची मागणी केली होती. त्यांनी यासंबंधी गृह मंत्रालयाकडे विचारणा केली होती. पण त्यांनी देण्यास नकार दिला. त्यांना फक्त पाच विमानं हवी होती. पण त्यांना एकही विमान देण्यात आलं नाही," असा गौप्यस्फोट सत्यपाल मलिक यांनी केला आहे.

दरम्यान 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. नंतर निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच गाजला होता. ते पुढे म्हणाले की,  "मी मोदींना फोन करुन केंद्राची चूक असल्याचं सांगितलं. केंद्राने विमानाची मागणी पूर्ण केली असती ते हा हल्ला झाला नसता. हे ऐकल्यावर त्यांनी मला शांत राहायला सांगितलं. 

पण सत्यपाल याबद्दल पहिलेच मीडिया पत्रकारांशी बोलले होते. तेही त्यांनी मोदी यांना सांगितले. यावर पंतप्रधान म्हणाले की, हे सगळं बोलू नका. ही वेगळी गोष्ट असून आम्हाला बोलू द्या. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही मला हे सगळं बोलू नका, तुम्ही शांत राहा असं सांगितलं. माझ्या लक्षात आलं की, हे सगळं आता पाकिस्तानच्या दिशेने जात असल्याने शांत राहण्यास सांगितलं जात आहे".