मुंबई : देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. SBIने अनेक विभागांमध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO)पदाच्या भरतीबाबत नोटीफिकेशन जारी केले आहे. नोटीफिकेशन नुसार एकूण 69 पदांवर भरती करण्यात य़ेणार आहे. इच्छुक उमेदवार SBIच्या अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे.
कोणत्या पदांवर होणार भरती
SBIच्या नोटीफिकेशन नुसार डेप्युटी मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर आणि प्रोडक्ट मॅनेजर या विविध पदांवर भरती होणार आहे.
असिस्टंट मॅनेजर , इंजिनिअर (सिविल) 36 पदे
असिस्टंट मॅनेजर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 10 पदे
असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग ऍंड कम्युनिकेशन) 4 पदे
डेप्युटी मॅनेजर 10 पदे
रिलेशनशिप मॅनेजर 6 पदे
प्रोडक्ट मॅनेजर 2 पदे
सर्कल डिफेंस एडवायझर 1 पद
अप्लाय कसे करावे
इच्छुक उमेदवारांनी सर्व पदांवर अप्लाय करण्यासाठी SBI च्या अधिकृत वेबसाईटवर www.sbi.co.in वर करिअर सेक्शनमध्ये जाऊन 13 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत अप्लाय करता येईल.
पात्रता
असिस्टंट मॅनेजर इंजिनिअर (सिविल)
सिविल इंजिनिअरींग बॅचलर डिग्री, किमान 60 टक्के मार्क
असिस्टंट मॅनेजर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग बॅचलर डिग्री, किमान 60 टक्के
असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग ऍंड कम्युनिकेशन)
MBA, PGDM डिग्री आवश्यक
रिलेशनशिप मॅनेजर
MBA / PGDM सोबत BE/B.Tech डिग्री आवश्यक
सर्कल डिफेंस एडवायझर
कॅंडिडेट भारतीय सेनेतून निवृत्त मेजर जनरल किंवा ब्रिग्रेडिअर असायला हवे.
अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.