SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ; १ जानेवारीपासून हे होणार बदल

स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि असोसिएटेड बॅंका आता विलग झाल्या आहेत.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 28, 2017, 11:45 AM IST
SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ; १ जानेवारीपासून हे होणार बदल title=

नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि असोसिएटेड बॅंका आता विलग झाल्या आहेत. एसबीआय शिवाय अन्य ५ बॅंकेत असलेले खाते स्टेट बॅंकेकडे जाईल. मात्र या असोसिएटेड बॅंकेची एक सुविधा संपुष्टात येईल. ३१ डिसेंबर २०१७ नंतर असोसिएटेड बॅंकेसहीत ६ बॅंकांचे चेकबुक अमान्य होईल. म्हणजे १ जानेवारी २०१८ नंतर तुम्ही चेकबुकने खात्यातून पैसे काढू शकणार नाही. सुरूवातीली हा नियम सप्टेंबरमध्ये लागू होणार होता. पण नंतर त्याची मर्यादा वाढवण्यात आली. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, सर्व बॅंकेच्या ग्राहकांना मोबाईल बॅंकीक किंवा बॅंकेच्या शाखेत जाऊन नव्या चेकबुकसाठी अर्ज करावा लागेल. यानंतर तुम्ही चेकबुकने ट्रांज्यक्शन होऊ शकेल.

या आहेत बॅंका

स्टेट बॅंक ऑफ बीकानेर एंड जयपुर
स्टेट बॅंक ऑफ मैसूर
स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर
स्टेट बॅंक ऑफ पटियाला
स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद
भारतीय महिला बॅंक

काय बदलले?

या बॅंकेचे ग्राहक आता एसबीआयचे ग्राहक झाले आहेत. मात्र एसबीआयच्या सेवा महागल्या आहेत. बॅकेच्या सर्व्हीस चार्जमध्ये बदल करण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे.

 

कोणत्या सेवा महागल्या?

एसबीआय आपल्या ग्राहकांना ३ महिन्यातून फक्त तीनदा खात्यात पैसे जमा करण्याची मोफत सुविधा देईल. चौथ्या वेळेपासून कॅशच्या प्रत्येक देवाणघेवाणीवर ५० रूपये शुल्क आकारण्यात येईल. तर चालू खात्यांसाठी हे शुल्क २०,००० रुपये देखील असू शकते.

मिनीमम बॅलन्सच्या नियमातही बदल 

बॅंकेने एटीएमसहित अन्य सेवा शुल्कात देखील बदल केला आहे. त्याचबरोबर मिनीमम बॅलन्सच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत.  मेट्रो सिटी कमीत कमी ५००० रूपये, तर शहरी भागात ३००० रूपये, सेमी अर्बन भागात २००० तर ग्रामीण भागात १००० रुपये कमीत कमी बॅलन्स असणे आवश्यक आहे. 

एटीएम सेवेतही शुल्क

एक महिन्यात अन्य बॅंकेच्या एटीएममधून तीन वेळापेक्षा अधिक वेळा पैसै काढल्यास २० रूपये तर एसबीआयच्या एटीएममधून पाच पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास १० रुपये शुल्क आकारण्यात येईल.