मुंबई : कोरोना काळात अनेक लोक घरी बसले आहेत किंवा बहुतेक लोकांना कमी पगारात नोकरी करावी लागत आहे. त्यामुळे लोकं आता पैसे कमावण्यासाठी दुसऱ्या पर्यायाच्या शोधात आहे. त्यामुळे अशा लोकांसाठी SBI बँक चांगली संधी देत आहे.आज आम्ही तुम्हाला असा एक उत्तम व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही घरी बसून महिन्याला 60 हजार रुपये सहज कमवू शकता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही, एक सुरक्षित पद्धत आहे. कारण ही संधी तुम्हाला SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे एसबीआय एटीएम फ्रँचायझी घेऊन तुम्ही सहज पैसे कमावू शकता. एटीएम हे कोणत्याही बँकेच्या वतीने लावले जात नाही, यासाठी एक वेगळी कंपनी काम करते. बँकेच्यावतीने ही कंपनी कंत्राट घेते, जे सर्वत्र एटीएम बसवण्याचे काम करते.
चला तर जाणून घेऊया एटीएम फ्रेंचाइजी घेऊन तुम्ही कसे पैसे कसे कमवू शकता.
1. SBI ATM ची फ्रँचायझी घेण्यासाठी तुमच्याकडे 50-80 चौरस फूट जागा असावी.
2. इतर एटीएम पासून त्याचे अंतर 100 मीटर असावे.
3. लक्षात ठेवा की, ही जागा तळमजल्यावर आणि लोकांना लगेच दिसेल अशी जागा असावी.
4. 24 तास वीज पुरवठा असावा, याशिवाय 1 किलोवॅट वीज जोडणी देखील अनिवार्य आहे.
5. या एटीएममध्ये दररोज सुमारे 300 व्यवहारांची क्षमता असावी.
6. एटीएमच्या जागेवर काँक्रीटचे छत असावे.
7. व्ही-सॅट स्थापित करण्यासाठी सोसायटी किंवा प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
1. ओळखपत्र - आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड
2. पत्त्याचा पुरावा - रेशन कार्ड, वीज बिल
3. बँक खाते आणि पासबुक
4. फोटो, ई-मेल आयडी, फोन नंबर
5. इतर दस्तऐवज
6. जीएसटी क्रमांक
7. आर्थिक दस्तऐवज
SBI ATM ची फ्रेंचायझी देणाऱ्या कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. Tata Indicash, Muthoot ATM आणि India One ATM ला भारतात एटीएम बसवण्याचे कॉट्रॅक्ट देण्यात आले आहेत.
यासाठी तुम्ही या सर्व कंपन्यांच्या वेबसाईटवर ऑनलाईन लॉग इन करून तुमच्या एटीएमसाठी अर्ज करू शकता.
Tata Indicash – www.indicash.co.in
Muthoot ATM – www.muthootatm.com/suggest-atm.html
India One ATM – india1atm.in/rent-your-space
या कंपन्यांमध्ये टाटा इंडिकॅश ही सर्वात मोठी आणि सर्वात जुनी कंपनी आहे. हे फ्रँचायझींना 2 लाखांच्या सिक्युरिटी डिपॉझिटवर ऑफर करते जे परत करण्यायोग्य आहे.
या व्यतिरिक्त, तुम्हाला 3 लाख रुपये कार्यरत भांडवल म्हणून जमा करावे लागतील. अशा प्रकारे, यामध्ये तुमची एकूण 5 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. जर तुम्ही यात कमाई पाहिली तर तुम्हाला प्रत्येक रोख व्यवहारावर 8 रुपये आणि नॉन-कॅश व्यवहारावर 2 रुपये मिळतात. म्हणजेच, गुंतवणूकीवरील परतावा वार्षिक आधारावर 33-50 टक्क्यांपर्यंत आहे.
उदाहरण-जर तुमच्या एटीएम द्वारे दररोज 250 व्यवहार केले जातात, ज्यामध्ये 65 टक्के रोख व्यवहार आणि 35 टक्के नॉन-कॅश व्यवहार आहेत, तर तुमचे मासिक उत्पन्न 45 हजार रुपयांच्या जवळपास असेल. त्याचबरोबर 500 व्यवहारांवर सुमारे 88-90 हजारांचे कमिशन असेल. म्हणजेच, एक-वेळच्या गुंतवणूकीनंतर, आपल्याला हा प्रचंड नफा मिळतो.