स्मॉल बिझनेसाठी तुम्हाला कर्ज हवंय? तर एसबीआयच्या स्किमबद्दल जाणून घ्या

SBI SME Smart Score : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या योजनेअंतर्गत, मॅनिफॅक्चरिंग, ट्रे़ड अँड सर्विसेसच्या यूनिट्ससाठी कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत लोन मिळू शकतं. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा...

Updated: Aug 3, 2022, 04:41 PM IST
स्मॉल बिझनेसाठी तुम्हाला कर्ज हवंय? तर एसबीआयच्या स्किमबद्दल जाणून घ्या title=

SBI Scheme : तुम्हाला स्मॉल बिझनेस सुरु करायचा असेल आणि तुम्हाला त्या बिझनेसच्या वर्किंग कॅपिटलसाठी फंडिंग हवं असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला मदत करु शकेल. छोट्या पातळीवर मॅनिफॅक्चरिंग किंवा ट्रेड अँड सर्विसेस बिझनेसच्या वर्किंग कॅपिटलच्या गरजेसाठी SBI च्या एसएमई स्‍मार्ट स्‍कोर (SME Smart Score) लोन सुविधेच्या अंतर्गत 50 लाख रुपयांपर्यंत सहजपणे लोन मिळवू शकता.

कोणाला मिळू शकतं हे लोन?

SBI च्या वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार, SME Smart Score ही एक कॅश क्रेडिट/ टर्म लोन सुविधा आहे. एमएसएमई सेक्टरची कोणतीही पब्लिक/प्रायवेट लिमिटेड कंपनी, पार्टनरशिप फर्म किंवा  SSI, C&I आणि SBF सेगमेंटच्या अंतर्गत येणारी ट्रे़डिंग अँड सर्विस सेक्टर या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अप्लाय करु शकतात. हे लोन वर्किंग कॅपिटलच्या गरजेसाठी किंवा फिक्स्ड अ‍ॅसेट खरेदी करण्यासाठी मिळतं.

किती रुपयांचं मिळू शकतं लोन?

SME Smart Score च्या अंतर्गत, मॅनिफॅक्चरिंग, ट्रेड अँड सर्विसेस यूनिट्ससाठी कमीत कमी 10 लाख तर जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत लोन मिळू शकतं. यामध्ये मार्जिन वर्किंग कॅपिटल 20 टक्के आणि टर्म लोनसाठी 33 टक्के आहे.

 प्रायसिंग आणि कोलेटरल सिक्युरिटीज...

एसबीआयने एसएमई लोन हे प्रतिस्पर्धी प्रायसिंगवर मिळतं जे बँकेच्या EBLR सोबत लिंक्ड असतं. फी आणि चार्जेस विषयी सांगायचं झालं तर ते लोन अमाउंटच्या 0.04 टक्के आहे. यामध्ये कोलेटरल सिक्युरिटी द्यावी लागत नाही. सर्व लोन क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस(CGTMSE) च्या अंतर्गत कव्हर आहे. यामध्ये गॅरंटी फी कर्जदाराला भरावी लागते.

काय आहे लोन रिपेमेंटचा कालावधी ?

SBI च्या वेबसाइट नुसार, कॅश क्रेडिट लोनचं दर दोन वर्षांनी विश्लेषण केलं जातं. यासोबतच, बिझनेसच्या परफॉर्मंसचं देखील प्रत्येक वर्षी विश्लेषण केलं जातं. टर्म लोन/ड्रॉलाइन OD साठी रिपेमेंट टेन्युअर 7 वर्षांपेक्षा जास्त नसेल. त्यानंतर, 6 महिन्यानंतरचा मॉरेटोरियम मिळू शकेल. संपूर्ण लोनचं विश्लेषण हे वार्षिक आधारावर होते.

काय आहे पात्रता?

SME Smart Score लोनसाठी चीफ प्रमोटर/चीफ एग्जीक्यूटिव्ह अप्लाय करु शकतात. त्यांच वय 18 ते 65 वर्ष यादरम्यान असायला हवं.

(Note : SBI SME Smart Score बद्दलची ही माहिती एक रेफरंससाठी आहे. लोन संबंधी निर्णय घेण्यासाठी बँकेकडून अधिकृत माहिती घ्या.)