School Holidays: नोव्हेंबरमध्ये शाळा, कॉलेजला 'इतक्या' सुट्ट्या! विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा

School Holidays: नोव्हेंबरमध्ये गुरु नानक जयंती, दिवाळी या दिवशी शाळांना सुट्टी असेल. त्यासोबत अनेक सुट्ट्यांची सविस्तर यादी जाणून घेऊया.

Pravin Dabholkar | Updated: Oct 30, 2023, 10:57 AM IST
School Holidays: नोव्हेंबरमध्ये शाळा, कॉलेजला 'इतक्या' सुट्ट्या! विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा  title=

School Holidays in November 2023: ऑक्टोबर महिना संपला आणि त्यासोबत नवरात्र, दसरा अशा सणांच्या सुट्ट्यादेखील संपल्या. आता शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यात किती दिवस सुट्ट्या असतील? हा प्रश्न पडला आहे. तुम्ही देखील सुट्ट्यांच्या माहितीसाठी येथे आला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची माहिती आहे. कारण नोव्हेंबर महिनादेखील खूप सुट्ट्यांचा आहे. या महिन्यात देशभरात सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे त्या त्या राज्यानुसार तेथील शाळांचे सुट्ट्यांचे वेळापत्रक समोर आले आहे. 

नोव्हेंबरमध्ये गुरु नानक जयंती, दिवाळी या दिवशी शाळांना सुट्टी असेल. त्यासोबत अनेक सुट्ट्यांची सविस्तर यादी जाणून घेऊया. नोव्हेंबर महिन्याता साधारण 12 दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये सलग सुट्ट्या फार कमी आहेत. रविवारच्या सुट्ट्या मिळून एकूण 12 ते 15 दिवस सुट्टी मिळू शकते. पण तुमची शाळा, कॉलेज यावरील अंतिम निर्णय घेऊ शकेल.

नोव्हेंबर महिन्यातील शाळा-कॉलेजच्या सुट्ट्यांची यादी 

01 नोव्हेंबर: बुधवार- राज्य स्थापना दिन, करवा चौथ
05 नोव्हेंबर : रविवार
11 नोव्हेंबर : दुसरा शनिवार
12 नोव्हेंबर: दिवाळी/रविवार
13 नोव्हेंबर: सोमवार विश्वकर्मा दिन / गोवर्धन पूजा
14 नोव्हेंबर: मंगळवार, भाऊबीज

Bank Holiday List: नोव्हेंबर महिना सणासुदीचा, तब्बल 'इतके' दिवस बॅंकांना सुट्ट्या

15 नोव्हेंबर: बुधवार
16 नोव्हेंबर: गुरुवार
19 नोव्हेंबर : रविवार, छठ पूजा
26 नोव्हेंबर : रविवार
27 नोव्हेंबर: सोमवार- गुरु नानक जयंती

नोव्हेंबरमध्ये छठ, दिवाळी, धनत्रयोदशी सारखे मोठे सण आहेत. त्यामुळे एकूण 12 दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.  इंटरनेटवर जाहीर केलेल्या सुट्टीच्या यादीनुसार, शाळा किंवा महाविद्यालयात सुट्टीची शक्यता फारच कमी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेकडूनच याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकते.