बाहेर फिरणारा कोरोना पॉझिटिव्ह दाखवा आणि ५०० रुपये मिळवा

संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी भितरवार तहसीलदारांनी एक युक्ति काढली आहे.

Updated: May 11, 2021, 10:15 PM IST
बाहेर फिरणारा कोरोना पॉझिटिव्ह दाखवा आणि ५०० रुपये मिळवा

भितरवार : गेल्या वर्षीच्या तुलनेत मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये कोरोना संसर्ग खूप वेगाने पसरत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण खूप वेगाने वाढत आहे. अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे लोकं कोरोना पॉझिटिव्ह असूनही घराबाहेर फिरत असतात. अशामुळे या भागात संसर्ग कमी होण्याचे नावच घेत नाहीत. यासागळ्यांना आळा घालायला हावा परंतु लोकं याला गांभिर्याने घेत नाहित, त्यामुळे मग या संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी भितरवार तहसीलदारांनी एक युक्ति काढली आहे. त्यांनी घराबाहेर फिरणाऱ्या पॅझिटिव्ह रूग्णांची माहिती देणाऱ्यांना 500 रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.

माहिती देणाऱ्यांच्या मदतीने कठोरपणा वाढवण्याची तयारी

गावात पॅझिटिव्ह रूग्ण घरात राहण्याऐवजी घराच्या बाहेर रस्त्यावर फिरतात. यामुळे गावातील अन्य लोकं संसर्गाच्या चपळ्यात येत आहेत. गावात संक्रमित रूग्णांची संख्या पूर्वीपेक्षा खूप वाढली आहे. संसर्गाचे प्रमाण वाढू नये यासाठी भितरवार प्रशासनाने निष्काळजीपणा करणाऱ्या लोकांना लगाम घालण्याची योजना तयार केली आहे.

भितरवार येथील तहसीलदार श्यामू श्रीवास्तव यांनी, कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण जर घराबाहेर फिरत असेल त्याची माहिती दिलेल्यांना 500 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

तहसीलदार श्यामू श्रीवास्तव म्हणाले की, "भितरवार शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या बाहेर फिरणाऱ्यांचा रिपोर्ट करणार्‍यांना 500 रूपये देण्यात येतील. तसेच माहिती देणार्‍या लोकांची नावे गुप्त ठेवण्यात येणार आहे."

खेड्यांमध्ये संक्रमणचे रुग्ण वाढले

ग्वाल्हेर ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. जिल्ह्यातील मोहना, पनिहार, घाटीगांव, चिनोर, ईंटमा येथे कोरोना रूग्णांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे. गेल्या 24 तासांत येथे 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत आणि सक्रिय रुग्ण संख्या 854 आहे.