पंतप्रधान मोदींना रोड शो न करण्याचा सल्ला

पंतप्रधानांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा खुलासा

Updated: Jun 9, 2018, 02:14 PM IST
पंतप्रधान मोदींना रोड शो न करण्याचा सल्ला title=

नवी दिल्ली : पुणे पोलिसांनी राजीव गांधींच्या हत्येप्रमाणे पंतप्रधान मोदींचा हत्येचा कट असल्याचा खुलासा केल्यानंतर सुरक्षा यंत्रणा पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेबाबत सतर्क झाल्या आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप)ने पंतप्रधान मोदींना रोड शो करण्य़ाचा सल्ला दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट असल्याचा खुलासा झाल्यानंतर SPG ने त्यांच्या जवानांना याबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
 
दूसरीकडे CPG ला देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. CPG चे जवान नेहमी पंतप्रधान मोदींच्या आजुबाजुला असतात. हे जवान पंतप्रधानांच्या आतल्या स्तराची जबाबदारी बजावतात. क्विक रिस्पांस टीम CAT ला देखील अलर्ट करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील ड्राईव्हरर्सला देखील याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.