राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांच्या घराची सुरक्षा भंग; घुसखोरीचा प्रयत्न

NSA अजित डोवाल यांच्या घरात संशयित व्यक्तीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.

Updated: Feb 16, 2022, 12:07 PM IST
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांच्या घराची सुरक्षा भंग; घुसखोरीचा प्रयत्न   title=

नवी दिल्ली : NSA अजित डोवाल यांच्या घरात संशयित व्यक्तीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो वेळीच पकडला गेला.

त्या व्यक्तीने अजित डोवाल यांच्या घरात कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी योग्य वेळी त्या व्यक्तीला थांबविले आणि ताब्यात घेतले. 

त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची टीम त्याची चौकशी करत आहे.

काही दिवसांपूर्वी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या कार्यालयाची आणि घराची रेकी करण्यात आली होती. ही रेकी पाकिस्तानच्या जैश - ए - मोहम्मदकडून करण्यात आली होती. 
 
जैश - ए - मोहम्मदचा दहशतवादी हिदायक मुल्ला याला अनंतनाग येथे अटक करण्यात आलं होतं. त्याच्या चौकशीतून ही माहिती बाहेर आली होती. त्यानंतर NSA अजित डोवाल यांचे कार्यालय आणि घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली होती.