नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात आता वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. अलिबागमधल्या कोरवाई गावात ठाकरे कुटुंबियांच्या नावावर १९ बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. यावर ठाकरे कुटुंब आणि त्या बंगल्यांच काहीही संबंध नाही असं सांगत संजय राऊत यांनी खोटे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांना जोड्याने मारू असा इशारा दिला होता.
आता किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा आरोप करत संजय राऊत यांना आव्हान दिलं आहे. किरीट सोमय्या यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत चक्क हातात जोडे घेत हायव्होल्टेज ड्रामा केला. संजय राऊत यांना मीच माझा जोडा देतो, त्या आधी रश्मी ठाकरे यांनी त्या बंगल्यांचा टॅक्स का भरले याचं उत्तर द्यावं, नाहीतर जोडे मारण्यासाठी संय राऊत यांना मी माझा जोडे देतो असं आव्हान दिलं आहे.
१९ बंगले दिसले की की जोडे मारू असं संजय राऊत म्हणाले, राऊत यांना नेमकं कोणाला जोडे मारायचे आहेत, असा उपरोधिक सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाचे कर भरल्याची कागदपत्र दाखवली.
वन विभागाच्या जमिनीवर हे घर बांधलं गेल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. घर नाहीत तर कर का भरतात? रश्मी ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२० ला कर भरला, आता त्यांची घरं चोरीला गेली काय? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांना मुख्यमंत्र्यांवर खुन्नस काढायची असेल तर त्यासाठी निल सोमय्या याचा उपयोग का करताय? असा टोलाही किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.
पाटनकर हे रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. कर्जतला हिंदू देवस्थानाची जमीन सलिम नावाच्या एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर झाली नंतर, ती पाटनकर यांच्या नावावर जमा झाली. यावरही सोमय्या यांनी आक्षेप घेतला आहे.
राकेश वाधवानशी माझ्या व्यवसायाचा काहीही संबध नाही. मुख्यमंत्री त्यांचेच आहेत. त्यांनी खुशाल चौकशी करावी. आम्ही तयार आहोत. परंतू कोविड सेंटर घोटाळ्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले आहे.