IT Stock | या 4 आयटी शेअर्समध्ये 1 वर्षासाठी पैसे गुंतवा; छप्परफाड कमाईसाठी तज्ज्ञांची निवड

आर्थिक वर्ष 2022च्या पहिल्या तिमाहीचे निकालांमध्ये IT सेक्टरच्या कंपन्यांना चांगला नफा झाल्याचे दिसून आले आहे

Updated: Jul 28, 2021, 02:49 PM IST
IT Stock | या 4 आयटी शेअर्समध्ये 1 वर्षासाठी पैसे गुंतवा; छप्परफाड कमाईसाठी तज्ज्ञांची निवड title=

मुंबई : आर्थिक वर्ष 2022च्या पहिल्या तिमाहीचे निकालांमध्ये IT सेक्टरच्या कंपन्यांना चांगला नफा झाल्याचे दिसून आले आहे. जून तिमाहीच्या निकालांमधून स्पष्ट संकेत मिळत आहेत की, येत्या दिवसांमध्ये आयटी कंपन्यांचे शेअर तेजीत असणार आहेत. आयटी सेक्टर सध्या गुंतवणूकीसाठी चांगले समजले जात आहे. स्टॉक मार्केटमधून पैसा त्या सेक्टरच्या स्टॉकमध्ये गुंतवायला हवा. ज्या कंपनीची पुढे प्रगती होत राहणार आहे. पुढील 4 IT शेअर गुंतवणूकीसाठी विचार केला जाऊ शकतो. असे तज्ज्ञांचे मत आहे.(Select Best Theme & Stocks)

GDPचा 7.7 टक्के भाग
आयटी इंडस्ट्री देशाच्या जीडीपीच्या 7.7 टक्के आहे. 2025 पर्यंत हे प्रमाण 10 टक्के असण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या तिमाहीमध्ये आयटी कंपन्यांचे उत्पन्न दमदार राहिले आहे. या आर्थिक वर्षात आयटी इंडस्ट्रीची ग्रोथ 14 ते 15 टक्के  इतकी अपेक्षित आहे. त्यामुळे मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअर्समध्ये पैसा गुंतवल्याने नक्कीच चांगला परतावा मिळू शकतो.

--------------

Mphasis Ltd.

लक्ष्य: 3130 रुपये अवधी 1 वर्ष
Mphasis Ltd एप्लिकेशन सर्विसेसमध्ये चांगले काम करीत आहे. पहिल्या तिमाहीचे निकाल शानदार आहेत. पुढील दोन वर्ष 16 टक्के प्राफिट मार्जिन राहण्याची शक्यता आहे.

Larsen & Toubro Infotech
लक्ष्य: 4720 रुपये अवधी 1 वर्ष
Larsen & Toubro Infotech ची क्लाइंट लिस्ट मजबूत आहे. कंपनीची प्रगती पाहता येत्या काळात प्राफिट मार्जिन वाढण्याची आशा आहे.

Cyient

लक्ष्य: 1240 रुपये अवधी 1 वर्ष
Cyient डेट फ्री कंपनी आहे. कंपनीचे ऑर्डरबुक चांगले आहे. पुढे शेअरमध्ये मजबूत ग्रोथ होण्याची शक्यता आहे.

Zensar Technologies Limited
लक्ष्य: 480 रुपये अवधी 1 वर्ष
टेक कंपन्यांच्या वॅल्युएशनच्या तुलनेत स्वस्त शेअर आहे. व्यवस्थापनाच्या मजबूत कामांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.