लसीसंदर्भात महत्त्वाची बातमी : सीरम, बायोटेक कंपनीकडून मोठी घोषणा

कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असताना महत्वाची घोषणा 

Updated: May 13, 2021, 07:27 AM IST
लसीसंदर्भात महत्त्वाची बातमी : सीरम, बायोटेक कंपनीकडून मोठी घोषणा title=

मुंबई : कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत जात असताना अनेक राज्यात कोरोनाप्रतिबंधात्मक लसींचा (Corona Vaccine) तुटवडा जाणवत आहे. यामुळे खूप मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अशावेळी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (Serum institute of India) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) ने आपल्या लसीकरणाच्या उत्पादनाचा रिपोर्ट केंद्र सरकारला दिला आहे. (Serum Institute, Bharat Biotech To Ramp Up Covid Vaccine Production By August) 

महत्वाची बाब म्हणजे सीरम इंस्टीट्यूटने ऑगस्टपासून प्रत्येक महिन्यात 10 करोड कोविशील्ड (Covishield) व्हॅक्सीन उत्पादन करणार असल्याचे सांगितले आहे. सोबतच भारत बायोटेक  प्रत्येक महिन्यात 7.8 करोड कोव्हॅक्सिन लस (Covaxin) बनवणार असल्याचे सांगितले आहे. बुधवारी सुत्रांनी याबाबत माहिती दिली आबे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, स्वास्थ मंत्रालय आणि ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया या दोन्ही कंपनीतून जू, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या उत्पादनाची माहिती मागितली आहे. त्यानंतर दोन्ही कंपन्यांनी सरकारला लस उत्पादन वाढवण्याबद्दल माहिती दिली आहे. 

भारत बायोटेकचे डॉ. वी कृष्ण मोहन यांनी सरकारला माहिती दिली की, कोवॅक्सिनचे उत्पादन जुलै महिन्यात 3.32 करोड आणि ऑगस्ट महिन्यात 7.82 करोड होणार आहे. तसेच सप्टेंबरमध्ये देखील हा आकडा तसाच आहे.

तसेच सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियामधील सरकार आणि नियमांची माहिती प्रकार कुमार सिंह यांनी माहिती दिली आहे. कोविशील्डचे उत्पादन ऑगस्टमध्ये 10 करोड पर्यंत वाढणार आहे. सप्टेंबरपर्यंत हा आकडा तसाच आहे. 

प्रकाश कुमार सिंह यांनी आरोग्य मंत्रालयाला माहिती दिली आहे. दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणार आहे. यासोबतच आमच्याकडील सगळ्या साधनांचा वापर करून दिलेल्या वेळेत काम पूर्ण करू. तसेच जून आणि जुलै महिन्यातील उत्पादनात देखील वाढ होईल. 

भारतात कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा वाढत आहे. एका दिवसात 4205 कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत एकूण 2,54,197 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 3,48,421  नवे रूग्ण सापडले आहेत. हा एकूण आकडा 2,33,40,938 एवढा झाला आहे. तर देशातील अनेक राज्यात कोरोनाप्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा जाणवत आहे.