गांधीनगर : पत्नीच्या असहमतीशिवाय सेक्स करणे हा बलात्कार नसल्याचे गुजरात उच्च न्यायलयाने म्हटलेय. मात्र असे असले तरी ओरल सेक्स म्हणजे क्रूरता असल्याचे निरीक्षण न्यायालयाने मांडलेय. एका महिलेने पतीविरोधात छळ आणि शारीरिक शोषण केल्याप्रकणी केस दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना हे निरीक्षण मांडले.
महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती तिची इच्छा नसतानाही सेक्ससाठी जबरदस्ती करत असते. तसेच तिने पतीवर ओरल सेक्स आणि अप्राकृतिक संबंध तसेच हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोपही केला होता.
गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जेबी पर्दीवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारिरीक संबंध ठेवणे म्हणजे पाप नव्हे. पत्नीच्या सांगण्यावरुन तिच्या पतीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ अंतर्गत केस दाखल होऊ शकत नाही. दरम्यान, एखादी महिला आपल्या पतीविरुद्ध अप्राकृतिक संबंध ठेवल्याप्रकरणी कलम ३७७ अंतर्गत केस दाखल करु शकते.
कोर्टाने याआधीच्या निर्णयाचा हवाला देताना म्हटलेय, एका व्यक्तीला आपल्या हक्काच्या पत्नीशी शारिरीक संबंध ठेवण्याचा अधिकार आहे. मात्र ती त्याची संपत्ती नव्हे आणि हे सगळं तिच्या इच्छेखेरीज होऊ नये.