'त्या' डागावरून ओरडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

अगदी नवीनच वयात आलेल्या १२ वर्षाच्या मुलीला मासिक पाळीच्या डागावरून ओरडल्यामुळे तिने उचलले टोकाचे पाऊल. शिक्षिकेने आपल्याला 'त्या' गोष्टीवरून सगळ्यांसमोर ओरडल्याने १२ वर्षीय तरूणाने छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 1, 2017, 02:27 PM IST
'त्या' डागावरून ओरडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या  title=

चैन्नई : अगदी नवीनच वयात आलेल्या १२ वर्षाच्या मुलीला मासिक पाळीच्या डागावरून ओरडल्यामुळे तिने उचलले टोकाचे पाऊल. शिक्षिकेने आपल्याला 'त्या' गोष्टीवरून सगळ्यांसमोर ओरडल्याने १२ वर्षीय तरूणीने छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. 

ही घटना तामिळनाडूच्या तिरूनेलवेली परिसरातील आहे. वर्गात शिक्षिकेने गणवेशाला मासिकपाळीचा डाग लागल्यामुळे ओरडले आणि म्हणून मुलीने इतके टोकाचे पाऊल उचलले. याबाबत पोलिसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थिनीने सुसाईडनोटमध्ये लिहिले होते की, शिक्षिकेने तिला या गोष्टीवरून खूप त्रास दिला होता. दुसऱ्या विद्यार्थिनीने त्या मुलीला डाग दाखवल्यानंतर तिने शिक्षिकेची मदत घेण्याचं ठरवलं आणि शिक्षिकेने मदत करण्या ऐवजी त्या मुलीला वर्गासमोर ओरडली. तेव्हा शिक्षिका हे विसरून गेली की त्या वर्गात मुलं देखील आहेत. 

जेव्हा विद्यार्थिनीच्या पालकांना हा प्रकार कळला तेव्हा त्यांनी शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांना तपासात असे देखील आढळले की, शिक्षिका त्या मुलीला सर्व प्रकार सांगण्यास सांगत होती. मात्र मुलीने त्याला विरोध केला.आणि तिने त्यानंतर इतके मोठे पाऊल उचलले.