नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स (BSE SENSEX) सुमारे 1400 अंकांच्या घसरणीसह 57,814 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (NIFTY 50) देखील सुमारे 350 अंकांच्या घसरणीसह 17,145 वर व्यवहार करत होता. जगभरातील कोरोनाचे नवीन स्ट्रेन सक्रिय झाल्याचा परिणाम बाजारावरही दिसून येत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचे नवीन स्ट्रेन आढळल्यानंतर जगभरात भीतीचे वातावरण आहे. दक्षिण आफ्रिकेतील विषाणूशास्त्रज्ञ टुलिओ डी ऑलिव्हेरा यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत मल्टीपल म्यूटेशनचे कोविड प्रकार समोर आला आहे. यानंतर, युनायटेड किंगडम (UK) ने 6 आफ्रिकन देशांमधील उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहे.
कोरोनाव्हायरसच्या नवीन स्ट्रेनचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. भारतीय बाजारांमध्ये ऑटो, बँका आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सला सर्वाधिक फटका बसला. निफ्टी फार्मा इंडेक्स हा एकमेव निर्देशांक तेजीत दिसून आला.
टाटा मोटर्समध्ये मोठी घसरण
ऑटो कंपन्यांचे शेअर्स एकामागून एक गडगडले. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली. TATAMOTORS स्टॉक 5.33 टक्क्यांच्या घसरणीसह 466 वर व्यवहार करताना दिसला.
बाजार तज्ज्ञांच्या मते, भारतीय बाजार घसरण्यामागे अनेक आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. कोरोनाव्हायरसचे नवीन प्रकार, कच्च्या तेलातील घसरण, धातू आणि वित्तीय बेंचमार्कमधील बिघाड आणि आशियाई बाजारातील तोटा भारताच्या शेअर बाजारावर दिसून येत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण आफ्रिकेत विषाणूचा एक नवीन प्रकार शोधला आहे. कोरोनाचे हे नवीन रूप विषाणूचे नवीन रूप पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. आणि हा विषाणू झपाट्याने पसरत आहे.
या नवीन प्रकारावर चर्चा करण्यासाठी आरोग्य संघटनेने तातडीची बैठक बोलावली आहे. या नवीन प्रकारावर कोविडची लसही कुचकामी असल्याचे WHO म्हणणे आहे.
कोविडच्या नवीन प्रकाराबाबत संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. ब्रिटनने अनेक देशांची विमानसेवा बंद केली आहे.
UKचे आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी ट्विट केले की, 'आरोग्य विभाग नवीन विषाणूची तपासणी करत आहे. खबरदारी शुक्रवार दुपारपासून सहा आफ्रिकन देशांच्या फ्लाइट्सवर तात्पुरती बंदी घातली जाईल.
युरोपमध्ये कोरोना पुन्हा सक्रिय झाल्यामुळे पुन्हा एकदा वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. युरोपातील अनेक देश विविध उड्डाणे रद्द करण्याच्या तयारीत आहेत.
ज्याचा थेट परिणाम व्यवसायावर होत आहे. विमान प्रवास पुन्हा विस्कळीत झाल्याने गुंतवणूकदार हतबल झाले आहेत. गुंतवणूकदारांच्या या निराशेमुळे आशियाई बाजारांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
जपानी Nikkei 225 मध्ये 800 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली.
ऑस्ट्रेलियन S&P ASX 200 (Australian S&P ASX) मध्ये देखील मोठी घसरण झाली. शांघाय कंपोझिट इंडेक्स (Shanghai Composite Index) 0.6 टक्क्यांनी घसरला.
कच्च्या तेलाच्या किमतींचाही थेट परिणाम भारतीय बाजारावर होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरले आहेत. त्याचा परिणाम शेअर बाजारांवर झाल्याचेही म्हणता येईल.