Adani Group : अदानी एन्टरप्रायझेसच्या (Adani Enterprises) शेअर्सना नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (Share Market) निर्बंधांच्या चौकटीत टाकले आहे. अदानी समूहातील अदानी एन्टरप्राझेस, अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट या तीन कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदी विक्रीच्या प्रत्येक व्यवहारावर आता कटेकोर लक्ष देण्यात येईल. निर्बंध असणाऱ्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे असतील किंवा विकायचे असतील तर व्यवहार करणाऱ्या ट्रेडिंग अकाऊंटमध्ये व्यवहारासाठी आवश्यक असलेली 100 टक्के रक्कम जमा करणं बंधनकारक असेल.
गेल्या काही दिवसात या तिन्ही शेअर्समध्ये स्पेक्युलेटीव्ही ट्रेडिंगचं प्रमाण किती तरी पटीनं वाढलंय. ते रोखण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजारानं हे पाऊल उचललं आहे. वायदा बाजारात एखाद्या कंपनीचे शेअर आपल्या खात्यात नसताना विकण्याची मुभा असते. यालाच शॉर्ट सेलिंग म्हणतात. शेअर शॉर्ट सेलिंग करताना एखादा गुंतवणूकदार पुढील काही दिवसात ज्या शेअरचे व्यवहार करु इच्छितात तो शेअर येत्या काही दिवसात कोसळेल अशी अटकळ बांधून व्यवहार करतात. अदानी समूहाच्या बाबतीत अशीच अटकळ बांधून केलेले व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यावर हे निर्बंध लागू करण्यात आलेत.
अमेरिकेच्या शॉर्ट-सेलिंग फर्म असलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) नकारात्मक अहवालामुळे सध्या भारतीय मार्केटमध्ये (Share Market) मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळाले. (RBI On Adani Group Case) अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स (Adani Group Shares) कोसळले. त्यामुळे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना मोठा धक्का बसला आहे. अशातच आता अदानी समुहाला धक्क्यावर धक्के बसले आहेत. आयबीआयने (RBI) कारवाई करण्याची पाऊले उचलली आहेत.
अदानीचे शेअर्स खाली आल्याने अनेकांना गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता रिझर्व बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) म्हणजेच आयबीआयने या प्रकरणात लक्ष घातलं आहे. बँकेचे नियमन करणाऱ्याने आयबीआयने सर्व बँकांकडून अहवाल (RBI instruction to all banks) मागवला आहे. अदानी समूहाला दिलेल्या कर्जाची माहिती देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. त्यामुळे आता गौतम अदानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अदानी समूहाचे शेअर्स आपटल्याचा थेट परिणाम गौतम अदानी यांच्या संपत्तीवर (Gautam Adani Net Worth) झाला आहे. दररोज त्यांच्या संपत्तीत दररोज कोटींनी घट होत आहे. मंगळवारी गौतम अदानी Top-10 Billionaires च्या यादीतून बाहेर पडले. आणि आता तर ते थेट पंधराव्या क्रमांकावर घसरले आहेत. फोर्ब्सच्या रियल टाइम बिलेनियर्स इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात अदानी यांच्या संपत्तीत तब्बल 750000000000 कोटी रुपयांची घट झाली आहे. आता त्यांची एकूण संपत्ती 75.1 अरब डॉलर इतकी झाली आहे.