adani ports

Adani Stocks: गौतम अदानींच्या 'या' शेअरनं केली दमदार कामगिरी; अजून किती कमाई करणार? जाणून घ्या

Adani Port Share: हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर गौतम अदानी (Gautam Adani Hindenberg) यांना धक्क्यावर धक्के बसले होते. त्यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये असणारं नावं पहिल्या क्रमांकावरून खाली खाली घसरत गेलं. त्यांच्या संपतीतही मोठी घट झाली. परंतु त्यांच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मात्र चांगली वाढ झालेली पाहायला मिळते आहे. तीन महिन्यांनंतरही (Adani Share Price Hike) ही वाढ कायम आहे. 

Apr 20, 2023, 06:24 PM IST

Adani Group: 20,000 कोटी कुठून आले? Rahul Gandhi यांच्या प्रश्नावर अदानी समुहाचं उत्तर, म्हणाले...

Adani Group On Rahul Gandhi: अदानी समूहाने 2.55 अब्ज डॉलर कसे उभे केले? आणि व्यवसायात गुंतवणूक कशी केली? याची खडा न खडा माहिती (Adani group response to Rahul Gandhis question) दिली आहे.

Apr 10, 2023, 08:16 PM IST

Gautam Adani : अदानी ग्रुपला झटका, आता मुंबईतील धारावीचा पुनर्विकास बोंबलणार?

Mumbai Dharavi Redevelopment Project : मुंबईतील धारावीचा पुनर्विकास बोंबलणार अशी शक्यता आता वाटू लागली आहे. अदानी ग्रुपला झटक्यांवर झटके बसत असल्याने धारावीच्या विकासाचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. अदानी समूहाला धारवीच्या (Dharavi) पुनर्विकासाचे कंत्राट मिळाले आहे. आता अदानी अडचणीत आल्याने या प्रकल्पाचे काय होणार याची चर्चा सुरु झाली आहे.

Feb 3, 2023, 09:21 AM IST

Adani Group : अदानी यांना आणखी एक मोठा झटका, शेअर बाजार व्यवहारांवर करडी नजर

Share Market : अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदी विक्रीच्या प्रत्येक व्यवहारावर आता कटेकोर लक्ष असणार आहे. निर्बंध असणाऱ्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे असतील किंवा विकायचे असतील तर व्यवहार करणाऱ्या ट्रेडिंग अकाऊंटमध्ये व्यवहारासाठी आवश्यक असलेली 100 टक्के रक्कम जमा करणं बंधनकारक असेल.

Feb 3, 2023, 08:33 AM IST

750000000000 इतक्या कोटीचा झाला अदानी यांच्या संपत्तीचा चुराडा, वाचा काय झालं

Billionaires List: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदाणी दहाव्या क्रमांकावर गेले आणि आता थेट पंधराव्या क्रमांकावर घसरण झाले.

Feb 2, 2023, 03:27 PM IST

Adani Group Hindenburg Report: अदानींची साथ सोडणार इतर कंपन्या? शेअर्स पडल्यानंतर सिंगापूरमधील कंपनीची मोठी घोषणा

Adani Group Hindenburg Report : गौतम अदानींच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव गडगडले आहेत. अदानी समुहाच्या कंपन्यांचे शेअर्सचे दर कोसळले असून अनेक कंपन्यांना तर लोअर सर्किट लागलं आहे. याचदरम्यान गौतम अदानींच्या मालकीच्या अदानी पोर्ट्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या सिंगापूरमधील कंपनीने एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

Jan 30, 2023, 04:40 PM IST