Shark Tank India :हॉटेलची टेबल साफ करायचा, आज आहे करोडोच्या कंपनीचा मालक, Success Story

Shark Tank India KR Bhaskar :शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India) दुसऱ्या सीझनमध्ये के आर भास्कर  (KR Bhaskar) हा स्पर्धक आला होता. हा भास्कर मुळचा कर्नाटकचा रहिवासी आहे. तो 'भास्कर्स पुरण पोळी घर' नावाचं ब्रँड चालवतो.आज भास्कर पुरणपोळी विकून दरमहा लाखोंची कमाई करत आहे.

Updated: Jan 13, 2023, 08:29 PM IST
 Shark Tank India :हॉटेलची टेबल साफ करायचा, आज आहे करोडोच्या कंपनीचा मालक, Success Story title=

Shark Tank India KR Bhaskar : शार्क टॅक इंडिया या (Shark Tank India) शोमध्ये एकापेक्षा एक भन्नाट टॅलेंटेड स्पर्धक आपले प्रोडक्टस अथवा बिझनेस आयडिया घेऊन येत असतात. अशीच एक बिझनेस आयडिया पाहुन जज थक्क झाले आहेत. कारण हा स्पर्धक एकेकाळी हॉटेलची टेबल आणि भांडी धूवायचा, आज मात्र तोच एका करोडोच्या हॉटेलचा मालक बनला आहे. त्याचा हा संघर्ष पाहून जज देखील थक्क झाले आहेत. आता त्याचा नेमका बिझनेस काय होता? व त्याने तो कसा वाढवला? हे जाणून घेऊयात.  

'भास्कर्स पुरण पोळी घर' नावाचं ब्रँड उभारलं

शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India) दुसऱ्या सीझनमध्ये के आर भास्कर  (KR Bhaskar) हा स्पर्धक आला होता. हा भास्कर मुळचा कर्नाटकचा रहिवासी आहे. तो 'भास्कर्स पुरण पोळी घर' नावाचं ब्रँड चालवतो.आज भास्कर पुरणपोळी विकून दरमहा लाखोंची कमाई करत आहे. त्यांचे आऊटलेट्स कर्नाटक आणि महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहेत. या आर्थिक वर्षात त्यांनी 3.6 कोटींची कमाई केली आहे.

हॉटेलची धुणी भांडी करायचा

शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India) दुसऱ्या सीझनमध्ये के आर भास्कर  (KR Bhaskar) हा स्पर्धक आला होता. या शोमध्ये त्याने त्याचा संघर्ष सांगितला. तो 12 वर्षांचा असताना त्याने एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायला सुरूवात केली होती. पाच वर्षे त्यांनी हॉटेलमधील टेबल आणि भांडी साफ केली. आठ वर्षे त्यांनी कोरीओग्राफर म्हणूनही काम केले.त्यानंतर त्याने पानाची गादी टाकली. मात्र त्याला कोणत्याच कामात मन रमत नव्हतं. त्यानंतर त्याने वयाच्या 23 व्या वर्षी सायकलवरून पुरणपोळी विकायला सुरुवात केली. आणि इथूनच त्याचे नशीब पालटले. आज तो करोडोंचा उलाढाल करतोय, तर दर महिन्याला लाखो रूपये कमावतोय.

माझी निवड एका कुकिंग शोसाठी झाली होती. या शोमधूनच त्याला ओळख मिळाली. यानंतर स्वतःचा ब्रँड स्थापन केला आहे, असे भास्कर याने सांगितले. आज, भास्करची कर्नाटकातच 17 दुकाने आणि 10 पेक्षा जास्त फ्रँचायझी आहेत. या दुकानांमध्ये त्यांची मासिक विक्री सुमारे 18 कोटी आहे, असे भास्करने  (KR Bhaskar) सांगितले. 

शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India) दुसऱ्या सीझनमध्ये पोहोचलेल्या भास्करची  (KR Bhaskar)कहाणी खुपच भावूक आणि थक्क करणारी आहे. वेटर म्हणून त्याने कामाला सुरुवात केली होती, आज तो एका मोठ्या कंपनीला मालक आहे. त्याची ही संघर्षकथा वाचून अनेकांना प्रेरणा मिळणार आहे.