नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीआधी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बहिण प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. राहुल यांनी प्रियांका यांना कॉंग्रेस महासचिव पदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या पूर्व उत्तर प्रदेशचा कार्यभाग देण्यात आला आहे. प्रियांका यांच्या राजकीय प्रवेशानंतर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच विरोधकांनी टीका करण्याची संधी सोडली नाही आहे. प्रियांका यांचा प्रवेश ही घराणेशाही असल्याची टीका भाजपने केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण रंगल्याचे चित्र आहे. प्रियांका यांच्या राजकीय प्रवेशामुळे कॉंग्रेसला फायदा होईल आणि याचा प्रभाव देशाच्या राजकारणावर दिसेल असेही मानले जात आहे. शिवसेनेने प्रियांका यांचे राजकारणात स्वागत करत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
राहुल गांधी यांनी प्रियांका यांना राजकारणात आणून खूप चांगले केल्याचे सेनेने म्हटले आहे.
Sanjay Raut, Shiv Sena on Priyanka Gandhi Vadra appointed Congress Gen Secy for UP East: It's a good decision by Rahul Gandhi, ppl of India always had a relation with Gandhi family. Indira Gandhi's legacy will always remain in this country, Congress will benefit from this. (23-1) pic.twitter.com/AX6qMONVr8
— ANI (@ANI) January 23, 2019
तसेच हा निर्णय घेण्यास उशीर झाल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. प्रियांका गांधी यांच्या नावाची औपचारीक घोषणा झाल्यानंतर शिवसेनेतर्फे प्रतिक्रीया देण्यात आली आहे. प्रियांका यांची कारकिर्द फार छान राहीली असून त्यांचे आणि इंदीरा गांधी यांचे गुण मिळत असल्याचेही सेनेने म्हटले आहे.
प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात येऊ शकतात असे बऱ्याच दिवसांपासून म्हटले जात होते. तसेच उत्तर प्रदेशच्या जनतेला मी खूप मोठे सरप्राईज देणार असल्याचे काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी म्हटले होते. काल प्रियांका यांच्या नावाची घोषणा करुन त्यांनी ते सरप्राईज खुले केले.
'प्रियांका यांचे चांगले व्यक्तीत्व, स्वत:ला सिद्ध करण्याची पद्धत आणि मतदारांशी जोडण्याच्या कौशल्याचा कॉंग्रेसला फायदा होईल. त्यांच्यामध्ये आजीचे गुण आहेत', असे शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनिषा कायंदे यांनी सांगितले. 'जेव्हा लोक मत द्यायला जातील तेव्हा त्यांना इंदिरा गांधींची नक्की आठवण येईल', असेही त्या म्हणाल्या.