Kerala university Four Students Dead : केरळच्या कोचिन युनिव्हर्सिटीमधून (Kochi University) धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोचिन विद्यापीठात म्युजिक कॉन्सर्टचं आयोजन (CUSAT Music Concert) करण्यात आलं होतं. कार्यक्रमावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची (4 Students Dead) खळबळजनक माहिती समोर आली आहे. विद्यापीठातील ओपन-एयर ऑडिटोरियममध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमाला गालगोट लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर या घटनेत 64 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
विद्यापीठात टेक फेस्टचे आयोजन करण्यात आलं होतं आणि गायिका निकिता गांधी कॅम्पसमध्ये असलेल्या खुल्या सभागृहात सादर करत होत्या. पोलिसांच्या अहवालात असं म्हटलं आहे की, पास असलेल्यांना प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला होता, परंतु जेव्हा पाऊस सुरू झाला तेव्हा परिस्थिती बदलली. बाहेर वाट पाहणारे लोक आश्रय घेण्यासाठी सभागृहात घुसले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. आयोजकांनी मुलांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेली होती. अनेकांनी एकमेकांनी तुडवत वाट काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळ उडाल्याचं दिसून आलं होतं.
#WATCH | Kerala | Four students died and several were injured in a stampede at CUSAT University in Kochi. The accident took place during a music concert by Nikhita Gandhi that was held in the open-air auditorium on the campus. Arrangements have been made at the Kalamassery… pic.twitter.com/FNvHTtC8tX
— ANI (@ANI) November 25, 2023
आणखी वाचा - 350 रुपयांसाठी तरुणाला 60 वेळा भोसकला चाकू; मृतदेहासमोर आरोपी नाचला, खळबळजनक Video समोर!
काही जण कार्यक्रमानंतर बेशुद्ध पडले. त्यात 15 मुली आणि 8 मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आलीये. 55 विद्यार्थी जखमींवर विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोन मुले आणि दोन मुलींना कोचीच्या कलामासेरी मेडिकल कॉलेजमध्ये मृत आणण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री जॉर्ज यांनी दिली आहे. दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांसह डॉक्टरांचे पथक रुग्णालयात पोहोचले, असं एर्नाकुलमचे जिल्हाधिकारी एनएसके उमेश यांनी सांगितलं आहे.