धक्कादायक : अचानक मुले होताहेत गायब, पोलिसही चक्रावले

गेल्या चार महिन्यांत राजधानी दिल्लीतून ८ ते ११ वयोगटातील १५८ मुले बेपत्ता झाली आहेत. पण, एकूण संख्या ही जास्तच आहे.

Updated: May 30, 2022, 05:12 PM IST
धक्कादायक : अचानक मुले होताहेत गायब, पोलिसही चक्रावले  title=

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत दिल्लीत लहान मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिल्ली पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चार महिन्यांत शहरात 1879 मुले बेपत्ता झाली आहेत. ही बेपत्ता झालेली मुले साधरणतः 12 ते 18 वयोगटातील होती.

12 ते 18 या वयोगटातील बेपत्ता मुलांची एकूण संख्या सुमारे 1583 असून त्यापैकी 1178 मुलांचा ट्रॅक काढण्यात दिल्ली पोलिसांना यश आलं आहे. बेपत्ता मुलांची संख्या गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा 2 टक्क्याने वाढली आहे.

0 ते 8 वयोगटातील 138 मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये 10 टक्क्यांची घट झाली आहे. या वर्षी गेल्या चार महिन्यांत 8 ते 11 वयोगटातील 158 मुले बेपत्ता झाली आहेत.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता व्यक्ती आणि फेशियल रेकग्निशन सिस्टीम सॉफ्टवेअर बेपत्ता मुलांचा शोध घेण्यास मदत करते. तसेच, पोलिसांचे पथक अनेकदा इतर राज्यांत जाऊन मुलांचा शोध शेल्टर होममध्ये घेत होते.

बेपत्ता झालेल्या अनेक प्रकरणांमधील मुले आर्थिक दुर्बल कुटुंबातील होती. काही वेळा कुटुंबांकडे मुलांचे फोटोही नसतात. त्यामुळे अन्य पुरावे शोधून त्यांच्या मदतीने या बेपत्ता पालकांचा शोध घ्यावा लागतो, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

बाल कल्याण समितीच्या एका सदस्याने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, बहुतेक प्रकरणांमध्ये मुलींमुळे मुले घरातून पळून गेल्याचे आढळून आले. तर पालकांची काळजी नसणं हे देखील एक कारण आहे. मुलांच्या वर्तनातील बदल किंवा बाहेरील लोकांचे त्यांच्या मुलांबद्दलचे वर्तन लक्षात घेण्यास पालक अपयशी ठरले आहेत यामुळेही मुले स्वतःहून घर सोडत आहेत.