अजबच! चेहरा माणसाचा अन् पाय 4; बकरीच्या पिल्लाचा फोटो पाहून व्हाल हैराण

धक्कादायक फोटो आले समोर 

Updated: Apr 8, 2021, 10:39 AM IST
अजबच! चेहरा माणसाचा अन् पाय 4; बकरीच्या पिल्लाचा फोटो पाहून व्हाल हैराण

मुंबई : निसर्ग कधी कधी काही वेगळ्याच गोष्टी समोर येत असतात. प्रत्येकाला धक्का बसेल अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तापी नदीच्या काठावर वसलेल्या गावात एक विचित्रच गोष्ट समोर आली आहे. या गोष्टीने गावकऱ्यांना धक्का बसला आहे.

तापी नदीच्या काठावर वसलेल्या सेल्टीपाडा गावात एका बकरीने म्हाताऱ्या व्यक्तीप्रमाणे दिसणाऱ्या बछड्याला जन्म दिला आहे. या पिल्लाचे चार पाय आणि कान अगदी बकरी सारखे आहेत. मात्र शरीर हे मानवी असल्याचं म्हटलं आहे.

अजय वसावा यांच्याकडे असलेल्या एका बकरीने या विचित्र बछड्याला जन्म दिला आहे. अजय वसावा हे शेतकरी असून त्यांच्याकडे काही बकरी देखील आहेत. 

त्यांच्या बकरीने जन्म दिलेला हा पिल्लू हा अगदी एका वृद्ध माणसासारखा दिसत आहे. या पिल्लाचे डोळे, तोंड आणि दाढी काही माणसासारखी आहे. एवढंच नव्हे तर या पिल्लाला शेपटी देखील नव्हती. 

धक्कादायक बाब म्हणजे या पिल्लाने अवघे 10 मिनिटंच श्वास घेतला. त्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर गावकऱ्यांनी पुर्वजांचा अंश असेल असं समजून त्या पिल्लाची पूजा केली. आणि त्याला शेतात अंत्यविधी केला.