आपल्या मोबाईलमध्ये ही 5 Govt. App असायला हवीत, या समस्यातून सुटका

एखादे सरकारी काम असेल तर तुम्हाला उपयोगी पणारी ही काही सरकारी अॅप्स.

Updated: Apr 8, 2021, 10:43 AM IST
आपल्या मोबाईलमध्ये ही 5 Govt. App असायला हवीत, या समस्यातून सुटका

मुंबई  : एखादे सरकारी काम असेल तर अनेक वेळा समस्यांचा सामना करावा लागतो. कागदपत्रांची कटक असते. अशीवेळी काही विसरलात तर ते तुम्हाला तापदायक ठरते. त्यामुळे सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. तसेच कधी  लांबलचक गर्दी आणि तर कधी संथ गतीने चालणारे काम ही नेहमीच सरकारी विभागांची एक समस्या असते. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या अ‍ॅप्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे काम अधिक सुकर होऊ शकेल. तुम्हाला उपयोगी पणारी ही काही सरकारी अॅप्स.

आरोग्य सेतु (Arogya Setu)
सध्या जगभरात कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये, आरोग्य सेतु हे सर्वात महत्वाचे अ‍ॅप आहे. कोणत्याही शासकीय आवारात प्रवेश करण्यासाठी ते बंधनकारक आहे. त्याशिवाय अलीकडेच केंद्र सरकारने कोरोना विषाणूची लसीकरण देखील सुरु केले आहे. या अ‍ॅपद्वारे आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी लसीकरणासाठी अपॉइंटमेंट सहज मिळवू शकता.

मायगोव्ह अ‍ॅप (MyGov App)
आपल्या मोबाइलसाठी MyGov App देखील खूप महत्वाचे आहे. या अ‍ॅपमध्ये सरकारी विभागांची माहिती उपलब्ध आहे. तसेच, कोणत्याही सरकारी कामासाठी आवश्यक असलेली माहितीही उपलब्ध आहे.

उमंग अ‍ॅप (Umang App)
Umang Appअर्थात Unified Mobile Application For New-Age Governance आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. या अ‍ॅपमध्ये आपल्याला आरोग्य सेवा, वित्त आणि गृहनिर्माण यासंबंधित माहिती मिळू शकेल. याशिवाय आपल्या पीएफशी संबंधित माहितीही येथे उपलब्ध आहे. या अ‍ॅपमध्ये शासनाकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीची माहिती देखील उपलब्ध आहे.

डिजिलॉकर अ‍ॅप (Digilocker App)
वाढत्या डेटा लीक होणे आणि गोपनीयता प्रकरणांमध्ये, केंद्र सरकारने विशेष Digilocker App सुरु केले आहे. या खास लॉकरमध्ये आपण आपल्या सर्व महत्वाच्या कागदपत्रांची डिजिटल प्रत ठेवू शकता.

एम परिवहन अ‍ॅप (mParivahan App)
mParivahan App हे देखील एक अतिशय महत्त्वाचे सरकारी अॅप आहे. या अ‍ॅपच्या मदतीने आपणास आपल्या कारची आणि बाईकची माहिती कळू शकेल. तसेच या अ‍ॅपमध्ये आपण आपली कार किंवा बाईकची आवश्यक कागदपत्रे ठेवू शकता.