Shocking News : मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली. त्यानंतर सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामला आईसह स्वत:चा फोटो शेअर केला आणि त्यावर लिहिलं माफ कर आई, मी तूझी हत्या केली. तूझी नेहमीच आठवण येईल, ओम शांती (Sorry mom, I killed you, I miss you). या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला असून आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे.
काय आहे नेमकी घटना?
गुजरातमधल्या (Gujrat) राजकोटमध्येही (Rajkot) ही धक्कादायक घटना घडली आहे. राजकोटमधल्या युनिव्हर्सिटी रोडवर 48 वर्षांची ज्योतिबेन गोसांई ही आपल्या मुलाबरोबर राहात होती. ज्योतिबेन हिला मानसिक आजार होता. ही महिला दररोज आपल्या मुलाशी भांडण करायची. दररोजच्या भांडणाला कंटाळून 21 वर्षांच्या निलेश नावाच्या मुलाने आईचा गळा आवळून तिची हत्या केली. यानंतर आईबरोबरचा एक फोटो त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केला. फोटोवर त्याने 'Sorry mom, I killed you, I miss you' असं लिहिलं. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आईची हत्या केल्यानंतर निलेशने पोलिसांना फोन करुन आपण आई ज्योतिबेन गोसांईची हत्या केल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला. तर निलेश गोसांईला आईच्या हत्येप्रकरणी अटक केली. पोलिसांच्या चौकशी निलेशने धक्कादायक कबुली दिली. आधी चाकूने आईची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण आईने चाकू हिसकावून घेतला. त्यानंतर चादरीने तिचं तोंड दावलं, ज्यात तिचा मृत्यू झाला. आईची हत्या केल्यानंतर आरोपीने आधी आपला मित्र भारतला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांना हत्येी माहिती दिली.
मृत्य ज्योतिबेन गोसांई ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक रित्या आजारी होती. या ना त्या कारणाने ती घराती मुलाशी भांडण करायची. तिच्यावर उपचारही सुरु होते. पण काही दिवसांपासून ज्योतिबेनने गोळ्या घेणं बंद केलं होतं. गोळ्या बंद झााल्याने तिचा स्वभाव आणखी तापट झाला होता. तिच्या स्वभावामुळेच पतीने तिच्याबरोबर घटस्फोट घेतला होता. निलेश आपल्या आईबरोबर राहात होता. पण आईच्या सततच्या भांडणामुळे तो देखील कंटाळला होता.
पोलिसांनी ज्योतीबेनच्या पतीला याबाबत माहिती दिली. पण त्याने ज्योतीबेनचा मृतदेह घेण्यास नकार दिला. ज्योतीबेनबरोबर आपला काहीही संबंध नसल्याचं त्याने पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी निलेशला तुरुंगात पाठवलं असून अधिक तपास सुरु आहे.
ENG
(1 ov) 2/0 (112.3 ov) 387
|
VS |
IND
387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(14.5 ov) 72
|
VS |
BRN
76/0(6.5 ov)
|
Bahrain beat Malawi by 10 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.