अंत्यसंस्काराला गेलेल्या लोकांवर कोसळलं छत; १८ लोकांचा मृत्यू

अंत्यसंस्काराला गेलेल्या लोकांवर कोसळलं छत

Updated: Jan 3, 2021, 05:01 PM IST
अंत्यसंस्काराला गेलेल्या लोकांवर कोसळलं छत; १८ लोकांचा मृत्यू  title=

मुंबई : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे रविवारी मोठी दुर्घटना घडली आहे.  पावसापासून बचावासाठी स्माशभूमीच्या छताखाली उभे असलेल्या १८ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. गाजियाबदच्या मुरादनगर मधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू होते. परंतु पाऊस मुसळधार असल्यानं अंत्यसंस्कारासाठी आलेले शंभर पेक्षा अधिक जण छताखाली आले. तेवढ्यात छत कोसळल्याने अनेक लोक ढिगा-यात अडकले.  स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफच्या मदतीनं आत्तापर्यंत १८  मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले आहेत तर २४ जखमींना रूग्णालयात पोहोचवले आहे.  

अंत्यसंस्काराला आले होते लोक 

गाझियाबाद (Ghaziabad) जिल्ह्यातील मुरादनगर येथे असलेल्या स्मशान भूमीत काही लोकं अंत्यसंस्कारासाठी सहभागी झाले होते. यावेळी सतत होणाऱ्या पावसामुळे छत कोसळलं. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात केली आहे. क्रेनच्या मदतीने मलबा हटवण्याचे काम सुरू आहेत. 

या घटनेनंतर अनेकांना धक्का बसला आहे. NDFR चं मदतकार्य सुरू आहे. अचानक छत कोसळल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.