धक्कादायक! एकाचवेळी सहा शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, या आहेत त्या शाळा, सर्च ऑपरेशन सुरू

शहरातील काही शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या असून पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत.

Updated: Apr 8, 2022, 06:38 PM IST
धक्कादायक! एकाचवेळी सहा शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, या आहेत त्या शाळा, सर्च ऑपरेशन सुरू title=

बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरूमधील काही शाळांमध्ये बॉम्बची धमकी देणारा ई मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शाळा व्यवस्थापनाने याची माहिती पोलिसांना देताच त्यांनी शाळांमध्ये शोधमोहीम सुरू केलीय.

बंगळुरूमधील 6 शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी सहाही शाळांचा परिसर गाठून तपास सुरू केला. मात्र, आतापर्यंत एकाही शाळेत स्फोटक साहित्य सापडलेले नाही.

या शाळांमध्ये आला ई मेल :

1. महादेवपुर पीएस लिमिट्स गोपालन इंटरनेशनल स्कूल

2. वर्थुर पीएस लिमिट्स दिल्ली पब्लिक स्कूल

3. मार्था हल्ली पीएस लिमिट्स न्यू अकादमी स्कूल

4. सेंट विंसेंट पॉल स्कूल, हेनूर पीएस

5. इंडियन पब्लिक स्कूल, गोविंदपुरा

6. एबेनेजर इंटरनेशनल स्कूल

या घटनेसंदर्भात माहिती देताना बेंगळुरूचे पोलिस आयुक्त कमल पंत यांनी सांगितले की, शहरातील काही शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत. तसेच, घटनास्थळी तपासासाठी बॉम्ब निकामी पथकेही पाठवण्यात आली आहेत.

तसेच, आमची पथके ई-मेलच्या आधारे घटनास्थळी तपासणी करत आहेत. याबात अधिक माहिती मिळाल्यावर ती प्रसारमाध्यमांना सांगण्यात येईल, मात्र, अद्याप काहीही माहिती समोर आली नसून ही अफवाही असू शकते असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.