viral snake video: सापाला चिकनप्रमाणे कचाकचा चावून खाल्लं...Viral Video पाहून येईल किळस

 viral snake video 1 नाही २ नाही तर चक्क 3-4  साप या व्यक्तीच्या हातात आहेत आणि मस्त मजेत तो त्यांच्यावर ताव मारतोय. 

Updated: Jan 6, 2023, 11:44 AM IST
viral snake video: सापाला चिकनप्रमाणे कचाकचा चावून खाल्लं...Viral Video पाहून येईल किळस title=

Viral trending snake video : साप म्हटलं तरी सर्वांची भंबेरी उडते. आजूबाजूला साप आहे हे ऐकलं तरी भीतीने आपली त्रेधातिरपीट उडते कुठे पळू कसं पळू अशी आपली अवस्था होऊन जाते. याला कारणही तसाच आहे कारण सापाने  एक चावा घेतला आणि जर तो साप विषारी असेल  तर आपला जीव गेलाच म्हणून समजा  (death causes snake bite) कारण पृथ्वीवर अत्यंत विषारी अश्या सापांच्या प्रजाती आहेत.

आजमितीला पृथ्वीवर 3000 सापांच्या प्रजाती आहेत त्यातले 200 पेक्षाही जास्त साप हे विषारी प्रजातीत गणले जातात. त्यामुळे आपल्या समोर आलेला साप हा विषारी आहे कि बिनविषारी सांगता येत नाही आणि म्हणून आपण घाबरतो . (poisonious snake)

पण सध्या एका वेगळ्या बातमीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय जो पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. काही लोक हे सापांपेक्षाही विषारी असतात असं जर तुम्हाला सांगितलं

तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. त्यासाठी हा व्हिडीओ तुम्ही नक्की पाहायला हवा . (shocking video of man eat snake like he is eating chicken viral )

व्हायरल होत असलेली व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाईकवर बसलाय आणि त्याच्या हातात साप आहे एखाद चिकन किंवा लॉलीपॉप खावं असं चक्क सापाला कचाकचा खातोय. वाचूनच अंगावर काटा आला ना.

1  नाही 2  नाही तर चक्क 3-4  साप या व्यक्तीच्या हातात आहेत आणि मस्त मजेत तो त्यांच्यावर ताव मारतोय. 

पाहणारे लोक स्तब्ध आहेत आपण जे पाहतोय त्यावर त्यांचा विश्वास बसत नाहीये असंच काहीसं वाटत आहे .  Gulte.com नावाच्या चॅनलवरून हा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय जवळपास लाखो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि यावर कॉमेंटसुद्धा करत आहेत 

हा व्यक्ती सापांना जस खातोय त्यावरून त्याला सापाचं विष चढत नाहीये का आणि नसेल चढत तर ते का ? असा प्रश्न व्हिडीओ पाहणार्यांना पडला आहे व्हिडिओवर युजर्सने अनेक कॉमेंट केल्या आहेत काही जण त्याला veda म्हणत आहे तर काही जण त्याला सापापेक्षाही विषारी आहे आस म्हटलंय.