३४ वर्षीय शिक्षिकेला १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत झालं प्रेम आणि मग...

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला पुन्हा एकदा काळीमा फासल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

Updated: May 26, 2018, 04:42 PM IST
३४ वर्षीय शिक्षिकेला १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत झालं प्रेम आणि मग... title=
Representational image

नवी दिल्ली : शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला पुन्हा एकदा काळीमा फासल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका ३४ वर्षीय शिक्षिकेला विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. शिक्षिकेवर आरोप आहे की ती विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करत असे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंडीगढमध्ये राहणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याला ३४ वर्षीय शिक्षिका ट्यूशनमध्ये शिकवत असे. त्याच दरम्यान या शिक्षिकेला विद्यार्थ्यावर प्रेम झालं आणि मग तिने विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली.

विद्यार्थाला पॉर्न व्हिडिओ दाखवत असे...

आरोपी शिक्षिकेवर आरोप आहे की, ती अल्पवयीन मुलाला पॉर्न व्हिडिओज दाखवत असे. तसेच त्याच्यासोबत रात्री अश्लील चॅटही करत असे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर आरोपी महिलेने सांगितले की, मी या विद्यार्थ्याशिवाय राहू शकत नाही. 

दोन मुल असलेल्या शिक्षिकेला झालं प्रेम

आरोपी शिक्षिकेला विद्यार्थ्यावर प्रेम झालं होतं आणि ती त्या मुला शिवाय राहू शकत नव्हती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्याला आपल्या घरात बंद केलं आणि एक कफ सीरप पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलाच्या पालकांनी पोलिसांच्या मदतीने मुलाला सोडवलं आणि आरोपी महिलेला अटक करुन उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केलं.

विद्यार्थ्याला दिला फोन आणि पाठवले पॉर्न व्हिडिओ

चाईल्ड लाईन १०९८च्या प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. संगिता जंड यांनी सांगितले की पीडित मुलाच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरा जवळ राहणाऱ्या शिक्षिकेकडे त्यांनी सप्टेंबर २०१७ रोजी आपल्या मुलाला क्लासेससाठी पाठवले. आधी मुलगा आणि मुलगी दोघेही क्लासेसला जात असत. मात्र, त्या शिक्षिकेने मुलगी अभ्यासात हूशार नसल्याचं सांगत तिचा क्लास बंद केला आणि मुलाला शिकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्याला फोन दिला आणि त्या द्वारे त्याला पॉर्न व्हिडिओ, अश्लिल मेसेजेस पाठवण्यास सुरुवात केली.

या प्रकरणी महिला शिक्षिकेविरोधात पोस्को अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे. तसेच पोलिसांनी पीडित विद्यार्थ्याचा जबाब नोंदवला असून अधिक तपास सुरु आहे.